Viral Video: ट्रेनमधून जाणाऱ्या महिलेनं मोठा दगड दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर भिरकावला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Woman throws stone at loco pilot: हा व्हिडिओ नेमका कुठल्या राज्यातील आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण, व्हिडिओ दिसत असलेली ट्रेन ईस्टर्न रेल्वे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Woman throws stone at loco pilot
Viral train video IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

लोको पायलटवर महिला दगड भिरकावत असल्याचा संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका ट्रेनमधून निघालेली महिला दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रेनवर दगड भिरकावताना दिसत आहे. हा व्हिडिओ आणि घटना सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.

ट्रेनमधून जात असलेली महिला दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर दगड भिरकावत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया एक्स, इन्स्टाग्राम आणि रेडिटवर देखील शेअर करण्यात आला आहे. महिला ट्रेनच्या दरवाजामध्ये उभी असल्याचे दिसत आहे.

तिने हातात एक दगड घेतला असून, समोरुन दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रेनला ती लक्ष्य करते. महिलेने दगड दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर जोरात भिरकावल्याचे व्हिडिओत दिसतंय. यानंतर महिला हाताने इशारा देखील करताना दिसत आहे.

Woman throws stone at loco pilot
ज्युनिअरने लास्ट ईअरच्या विद्यार्थीनींवर कॉलेजच्या बाथरुममध्ये केला लैंगिक अत्याचार; अत्याचारानंतर म्हणाला, 'गोळी हवी का'?

महिला देखील प्रचंड रागात असल्याचे दिसत असून दगड मारल्यानंतर ती हाताने ट्रेनच्या दिशेने काहीतरी बोलताना दिसत आहे. ही संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यानिमित्ताने विविध चर्चांना देखील उधाण आले आहे. महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा अनेकांनी केला आहे तर, ही महिला बांगलादेशातून स्थलांतरीत झाल्याचा दावा केला जातोय.

Woman throws stone at loco pilot
Goa Mining: खूषखबर! राज्य खाण तयारी निर्देशांकात गोवा अव्वल; उद्योगवाढीची केंद्राला अपेक्षा

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठल्या राज्यातील आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण, व्हिडिओ दिसत असलेली ट्रेन ईस्टर्न रेल्वे (ER) असून ती पश्चिम बंगाल, बिहार या भागातील असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओत दिसणारी महिला स्थलांतरीत बांगलादेशी असल्याचा दावा केला आहे.

नेटकऱ्यांनी महिलेच्या या कृत्याचा निषेध केला असून, याप्रकरणी योग्य कारवाईची मागणी केली. दगड भिरकावल्याने लोको पायलटला काही इजा तर झाली नाही ना? अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com