Even Hitler Gave Jobs To Lackeys Arvind Kejriwal All Out Attack On PM  Dainik Gomantak
देश

'हिटलरनेही नोकऱ्या दिल्या, मोदींनी तुम्हाला काय दिले'

राजकीय फायद्यासाठी मोदींना चित्रपटाची मदत घ्यावी लागते; अरविंद केजरीवाल

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेच्या सभागृहातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटावरून भाजपचा केजरीवाल यांनी चांगला समाचार घेतला आणि जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा उल्लेख केला.

"हिटलरनेही आपल्या जनतेला नोकऱ्या दिल्या. मोदींनी तुम्हाला काय दिले?" असा थेट सवाल केजरीवाल यांनी केला, "अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तुमच्यासाठीही काम करतात. तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी असेल तर केजरीवाल तुम्हाला औषधे देतात, मोदी नाही. डोळे उघडा, भाजप (BJP) सोडा आणि 'आप'मध्ये या," अशी टीका केजरीवाल यांनी केली.

यापूर्वी आपल्या भाषणात केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजधानीत काश्मीर फाइल्स करमुक्त करण्याच्या मागणीवर भाजपवर हल्ला केला.

"तुम्ही आम्हाला ते करमुक्त करण्यास का सांगत आहात? तुमची इतकी इच्छा असेल तर विवेक अग्निहोत्री यांना तो चित्रपट यूट्यूबवर टाकायला सांगा, ते सर्व विनामूल्य होईल. प्रत्येकजण ते एका दिवसात पाहू शकतील. गरज कुठे आहे? ते करमुक्त करा," दिल्ली विधानसभेच्या सदस्यांच्या हशा आणि मेजांच्या थाटात केजरीवाल म्हणाले.

त्यानंतर, पंतप्रधान (PM) मोदींवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, आठ वर्षे देशावर राज्य करूनही पंतप्रधानांना "राजकीय फायद्यासाठी चित्रपटाची (movies) मदत घ्यावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT