Enforcement Directorate Officer Arrested In Jaipur: अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे नेत्यांच्या ठिकाणांवर सातत्याने होणारी छापेमारी आणि त्यांच्यावर सुरु असलेली कारवाई. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्याकडून लाच मागितल्याची बातमी राजस्थानमधून समोर आली आहे.
जयपूरमध्ये (Jaipur), लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या पथकाने लाच घेतल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) इंफाळच्या एका अधिकाऱ्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तक्रारदाराकडून 15 लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाच घेतल्याचा आरोप असलेला अधिकारी एका प्रकरणात त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या आरोपीकडून पैसे मागत होता.
चिटफंड प्रकरणातील आरोपीला (Accused) अटक न केल्याच्या बदल्यात ईडीच्या अधिकाऱ्याने 17 लाख रुपयांची मागणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला ईडी अधिकारी मणिपूरमधील इंफाळ येथील कार्यालयात काम करत होता.
अंमलबजावणी अधिकारी (ईओ) नवलकिशोर मीना असे त्याचे नाव आहे. याशिवाय, त्याचा स्थानिक सहकारी बाबुलाल मीणा यालाही अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे, इंफाळ येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात नोंदवलेल्या चिटफंड प्रकरणात त्याच्याविरुद्धचा खटला बंद करणे, मालमत्ता जप्त न करणे आणि अटक न करण्याच्या बदल्यात 17 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराकडून करण्यात आली.
अशी मागणी आरोपी प्रवर्तन अधिकारी नवलकिशोर मीणा यांनी केली होती. पैशासाठी ते मला सतत त्रास देत होते. या प्रकरणी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याविरुद्धच्या तक्रारीची पडताळणी केली आणि गुरुवारी आरोपी अधिकारी नवलकिशोर मीना उर्फ एनके मीना यांना जयपूर येथून अटक केली.
यावेळी त्यांचा साथीदार बाबुलाल मीना उर्फ दिनेश याच्यामार्फत तक्रारदाराकडून 15 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकारी नवलकिशोर हे मूळचे बस्सीच्या विमलपुरा गावचे रहिवासी आहेत. तर त्यांचे सहकारी बाबूलाल हे उपनिबंधक कार्यालय-मुंडवार येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.