Satyendra Kumar Jain Dainik Gomantak
देश

Money Laundering Case मंत्री सत्येंद्र जैन अडचणीत, पूनम जैन यांची ईडी चौकशी सुरु

Delhi Govt: दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

दैनिक गोमन्तक

Money Laundering: दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मागील दोन-तीन महिन्यांपासून ईडी त्यांची चौकशी करत आहे. यातच आता ईडीने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात जैन यांची पत्नी पूनम जैन यांची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने गेल्या आठवड्यात सत्येंद्र जैन यांची पत्नी पूनम जैन यांना समन्स बजावले होते.

वास्तविक, ईडीने मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना 30 मे रोजी कोलकाता येथील एका कंपनीच्या कथित मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अटक केली होती. याच प्रकरणी ईडीने सत्येंद्र यांची पत्नी पूनम जैन यांना 14 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, पूनम जैन यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून चौकशी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती.

उत्पन्नाच्या दुप्पट मालमत्ता असल्याचा आरोप

आता सोमवारी या प्रकरणी ईडीने पूनम यांची चौकशी सुरु केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ईडीचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या 2017 च्या एका प्रकरणावर आधारित आहे, ज्यामध्ये 'आप' नेते आणि त्यांची पत्नी पूनम जैन यांनी फेब्रुवारी 2015 ते मे 2017 दरम्यान ₹ 1.47 कोटी कमावल्याचा आरोप करण्यात आला होता. हे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या दुप्पट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT