Enforcement Directorate  Dainik Gomantak
देश

Money Laundering Case: ईडीची मोठी कारवाई; 5000 कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला IGI विमानतळावरुन अटक

Enforcement Directorate: ईडीचे म्हणणे आहे की, आरोपीने सायबर क्राईम आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य लोकांची 5000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

Manish Jadhav

Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी (IGI) आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अंमलबजावणी संचालनालयाच्या टीमने एका मोठ्या आरोपीला अटक केली. ईडीचे म्हणणे आहे की, आरोपीने सायबर क्राईम आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य लोकांची 5000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. हे आरोपी फसवणुकीचा पैसा व्हाईट करण्यासाठी भारताबाहेर पाठवत.

नेपाळहून आल्यानंतर अटक केली

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आलेल्या आरोपीची माहिती दिली. ईडीने सांगितले की, सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य जनतेची सुमारे 5,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पुनीत कुमार उर्फ ​​पुनीत माहेश्वरीला 3 एप्रिल रोजी नेपाळहून आगमन झाल्यानंतर लगेचच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 वरुन अटक करण्यात आली, असे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. दिल्लीच्या मोती नगर भागातील रहिवासी असलेल्या कुमारवर सर्वसामान्यांची फसवणूक करणे, गुन्ह्यातून मिळालेला पैसा व्हाईट करण्यासाठी भारताबाहेर पाठवणे अशाप्रकारचे अनेक गंभीर आरोप आहेत.

एक आरोपी आधीच अटक

पुनित कुमार उर्फ ​​पुनित माहेश्वरी याने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये असलेल्या सर्व्हरचा वापर करुन लोकांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीने केला आहे. गेल्या महिन्यात ईडीने याच प्रकरणात आणखी एक आरोपी आशिष कक्करला गुरुग्राममधील हॉटेलमधून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. हे मनी लाँड्रिंग प्रकरण दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा आणि इतर काही ठिकाणी दाखल पोलिस एफआयआरशी संबंधित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

SCROLL FOR NEXT