Singapore Money Laundering Raid: सिंगापूरमध्ये मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी मोठी कारवाई, 61 अब्ज किमतीची मालमत्ता जप्त

जप्त केलेल्या मालमत्तेत पॉश भागातील आलिशान बंगले, रोख रक्कम, आलिशान कार, दागिने, हँडबॅग आणि सोन्याचे बार यांचा समावेश आहे.
Singapore anti-money laundering raids
Singapore anti-money laundering raidsSingapore Police Force

Singapore anti-money laundering raids: सिंगापूरमध्ये मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सिंगापूर पोलिसांनी परदेशी लोकांच्या टोळीकडून एक अब्ज सिंगापूर डॉलर्स (सुमारे 61 अब्ज भारतीय रुपये) किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेत पॉश भागातील आलिशान बंगले, रोख रक्कम, आलिशान कार, दागिने, हँडबॅग आणि सोन्याचे बार यांचा समावेश आहे.

सिंगापूर पोलिसांनी मंगळवारी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी मोठी कारवाई मोहीम हाती घेतली. यात, पोलिसांनी 400 अधिकाऱ्यांच्या मदतीने शहर-राज्यातील ऑर्चर्ड रोड शॉपिंग बेल्टपासून सेंटोसा रिसॉर्ट बेटापर्यंतच्या घरांवर छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली.

सिंगापूर माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जवळपास नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यात एक अब्ज सिंगापूर डॉलर्सची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये 94 मालमत्ता, सिंगापूर डॉलर्स 110 दशलक्ष किमतीची बँक खाती, 50 वाहने, सिंगापूर डॉलर्स 23 दशलक्ष रोख रक्कम, शेकडो लक्झरी हँडबॅग आणि घड्याळे यांचा समावेश आहे.

Singapore anti-money laundering raids
Singapore anti-money laundering raidsSingapore Police Force
Singapore anti-money laundering raids
Two Kenyan Arrested In Goa: वैध पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय गोव्यात वास्तव्य, केनियाच्या दोघांना हणजुणेत अटक

या प्रकरणी पोलिसांनी 31 ते 44 वयोगटातील 10 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. शेजारीच असलेल्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून एका व्यक्तीने उडी मारली. त्याला देखील अटक करण्यात आली.

दरम्यान, हा व्यक्ती जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी अटक करण्यात आलेल्या इतर लोकांमध्ये चीन, कंबोडिया, सायप्रस आणि वानुआतू या देशातील नागरिकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com