Baramulla Encounter  ANI
देश

Encounter मध्ये 1 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये नाकेबंदी

दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोर्चा काढत कारवाई सुरू केली.

दैनिक गोमन्तक

Jammu Kashmir Baramulla Encounter: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, या चकमकीत सुरक्षा दलांनी 1 दहशतवाद्याला ठार केले आहे. या गोळीबारात दोन जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोर्चा काढत कारवाई सुरू केली.

जम्मू-काश्मीरच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील करेरी भागातील वानिगम बाला येथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली.

बारामुल्लामध्ये चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. शोध मोहिमेदरम्यान तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला ठार केले. एक स्थानिक आणि एक पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिची सुरक्षा दलाला मिळाली होती.

बुधवारी कुलगाममध्ये चकमक झाली

याआधी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. यादरम्यान लष्कराचा एक जवान जखमी झाला होता. कुलगाम चकमकीदरम्यान दहशतवादी कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले. जिल्ह्यातील बरिहार्द काठपुरा भागात अनेक दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT