INS Tarkash स्वातंत्र्यदिनी या देशात फडकवणार तिरंगा, जाणून घ्या काय आहे योजना

भारतीय नौदलाच्या (Indian Navy) मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका INS Tarkash ने भूमध्य सागरी तैनाती यशस्वीपणे पार पाडली आहे.
INS Tarkash
INS TarkashTwitter/Indiannavy
Published on
Updated on

INS Tarkash in Rio de Janeiro: भारतीय नौदलाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या (Indian Navy) मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका INS Tarkash ने भूमध्य सागरी तैनाती यशस्वीपणे पार पाडली आहे. आता आयएनएस तर्कशने अटलांटिकमध्ये (Atlantic) प्रवेश केला असून त्याचा पुढील प्रवास सुरू ठेवला आहे.

INS Tarkash
Congress नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची मागितली माफी, 'चुकून ते शब्द निघाले'

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात येणार असल्याची माहिती नौदलाने दिली. INS Tarkash राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे जात आहे. हा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून होणार आहे.

यापूर्वी, भारतीय नौदलाच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका INS तर्कशने 26 जुलै रोजी रॉयल मोरोक्कन नौदल जहाज हसन II या फ्लोरल क्लास कॉर्व्हेटसह अटलांटिकमध्ये सागरी भागीदारी सरावात भाग घेतला होता. यादरम्यान आयएनएस तर्कशने मॅन ओव्हरबोर्ड ड्रिल, व्हिजिट बोर्ड सर्च आणि सीझर ऑपरेशन, टॅक्टिकल मॅन्युव्हर्स आणि हेलिकॉप्टर क्रॉस डेक लँडिंग यासारखे सराव केला.

INS Tarkash
दिल्ली HC चा मोठा निर्णय, 'TV अन् Social Media वरील कमेंट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग'

सध्या, भारतीय नौदलाने आपल्या नुकत्याच दिलेल्या निवेदनात माहिती दिली होती की, मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका INS तर्कश 27 जूनपासून पाच महिन्यांसाठी त्यांच्या विशेष मोहिमेवर पाठवण्यात येत आहे. यादरम्यान, ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे राष्ट्रध्वज फडकवणे हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत त्याचे मुख्य वैशिष्ट्य असेल. सध्या, आपल्या मोहिमेदरम्यान, INS तरकश युरोप, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील अकरा देशांमधील 14 बंदरांना भेट देईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com