Election Commission Issues Advisory To Rahul Gandhi: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात ॲडव्हायजरी जारी केली आहे. या ॲडव्हायजरी अंतर्गत त्यांना सतर्कता बाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशासह सर्व तथ्ये आणि पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या काही टिप्पण्यांसंदर्भातील उत्तर यांचा विचार केल्यानंतर, भारताच्या निवडणूक आयोगाने त्यांना भविष्यात सतर्कता बाळण्याचा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने राहुल गांधींनी आधीच्या पीएम मोदींसाठी 'पनौती' आणि 'पिकपॉकेट' सारखे शब्द वापरल्याबद्दल ही ॲडव्हायजरी जारी केली आहे. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, ज्याची दखल घेत आयोगाने 23 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. राहुल गांधींच्या उत्तरानंतर ही ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. यासोबतच, गेल्या वर्षी डिसेंबरच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना निवडणूक प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि राजकारण्यांसाठी जारी केलेल्या ॲडव्हायजरीचे योग्यरित्या पालन करण्यास सांगितले आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले होते की, “PM म्हणजे ‘पनौती मोदी’.” विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, ''टीम इंडिया विश्वचषक चांगली जिंकत होती पण त्यांचा पराभव झाला.''
त्याचवेळी, 1 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या ॲडव्हायजरीमध्ये निवडणूक आयोगाने असा इशारा दिला होता की, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास पक्ष, उमेदवार आणि स्टार प्रचारकांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. ॲडव्हायजरीमध्ये असेही म्हटले आहे की, स्टार प्रचारक आणि उमेदवार ज्यांना आधीच नोटिसा मिळाल्या आहेत त्यांनी पुन्हा आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.