El Nino Rabi Crops Dainik Gomantak
देश

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

El Nino impact on Rabi Crops: रब्बी पिकांची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते आणि कापणी मार्च-एप्रिलमध्ये होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला असून, त्याचा रब्बी पिकांच्या उत्पादनावर, विशेषतः सिंचनाची सोय नसलेल्या कोरडवाहू भागात मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता  केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्र यांनी व्यक्त केली आहे. 

रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत चंद्र यांनी या आव्हानाकडे लक्ष वेधलेwww.येत्या  हंगामात धान्य उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता दिसत असून, कोरडवाहू भागासाठी रब्बी हंगामही आव्हानात्मक असेल, असा इशाराही दिला आहे. रब्बी पिकांची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते आणि कापणी मार्च-एप्रिलमध्ये होते. 

गहू, हरभरा आणि मोहरी ही या हंगामातील प्रमुख पिके आहेत. जमिनीतील ओलावा कमी असल्यास बियाण्यांची उगवण नीट होत नाही आणि पीक वाळण्याचा धोका असतो. रब्बी पिकांची पेरणी साधारणतः एकूण ६ कोटी ३८ लाख हेक्टर क्षेत्रात केली जाते. यापैकी गव्हाची पेरणी तीन कोटी, कडधान्ये १.४ कोटी, तेलबिया ८७ लाख आणि भरडधान्य ५५ लाख हेक्टर क्षेत्रात घेतले जाते.

कोलंबिया विद्यापीठाच्या ‘इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट अँड सोसायटी’च्या ताज्या अंदाजानुसार, ‘एल निनो’ची हवामान स्थिती अधिक तीव्र होत असून २०२६च्या उत्तरार्धात आणि २०२७ च्या सुरुवातीला ती अत्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतासाठी हवामानाचा धोका वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामसुद्धा अत्यंत आव्हानात्मक राहिला असून कोरडवाहू क्षेत्रांत  अनेक राज्यांना आधी पेरणीखालील क्षेत्र गाठण्यासाठी आणि नंतर पिके जगवण्यासाठी मोठी धडपड करावी लागल्याचे चंद्र यांनी नमूद केले.  भारतातील प्रमुख कृषी राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राने आपल्या ३५८ तालुक्यांपैकी तब्बल ७४ टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या पाठोपाठ चंद्रा यांनी ही चिंता व्यक्त केली असून त्यामुळे  देशातील एकूण अन्नधान्य उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पावसाच्या तीव्र तुटीचा सामना करणारी इतर राज्यांवरही लवकरच अशीच परिस्थितीत ओढवण्याची शक्यता आहे.  काही राज्यांना जमिनीतील दलदलीचा सामना करावा लागू शकतो, तर कमी पाऊस झालेल्या भागात पिकांना दीर्घकाळ पाण्याचा ताण सहन करावा लागू शकतो, असे आतिश चंद्र म्हणाले. अशा स्थितीत  रब्बी हंगामासाठी त्या-त्या परिस्थितीनुसार रणनीतीत बदल करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काही कोरडवाहू भागांवर परिणाम झाला असला, तरी एकंदरीत खरीप पिकांवर ‘एल निनो’चा प्रभाव मर्यादित राहिल्याचे दिसते. मात्र, साधारणपणे ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या आगामी रब्बी पेरणीच्या हंगामात ‘एल निनो’चे परिणाम अधिक ठळकपणे दिसून येऊ शकतात.  हवामान बदल हे एक वास्तव आहे. सिंचनाची सोय असलेल्या भागातही अनेक ठिकाणी अवेळी आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे,  असे चंद्र म्हणाले.

‘महाराष्ट्र-कर्नाटकात उच्चस्तरीय पथक’

केंद्र सरकार लवकरच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये पावसाची तीव्र तूट असलेल्या भागात दुष्काळाच्या प्रभावाचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय पथक पाठवेल, असे या बैठकीला संबोधित करताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.  नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामात हवामान बदलामुळे काही भागांत निर्माण झालेला दुष्काळ आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी येत्या रब्बी हंगामासाठी शास्त्रीय नियोजनासह काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आगामी हंगामात उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामही पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी आव्हानात्मक असेल.

- अतिश चंद्र, केंद्रीय कृषी सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

SCROLL FOR NEXT