El Nino Efect India Dainik Gomantak
देश

Monsoon: जून महिन्यातच 'एल निनो'चा थेट वार! कोरड्या वाऱ्यांनी रोखला मान्सूनचा रस्ता; देशातील 9 राज्यांमध्ये पाण्यासाठी उडणार हाहाकार?

El Nino Efect India: मान्सूनची प्रगती सुरू असतानाच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर उद्‍भवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीमुळे देशातील अनेक राज्यांत पावसात मोठी तूट नोंदली गेली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पुणे: मान्सूनची प्रगती सुरू असतानाच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर उद्‍भवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीमुळे देशातील अनेक राज्यांत पावसात मोठी तूट नोंदली गेली आहे. अरबी समुद्रावर वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनी मोसमी वाऱ्यांना रोखून धरले असतानाच, दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील बाष्प थेट प्रशांत महासागराकडे खेचले जात आहे.

प्रशांत महासागरात तयार झालेल्या ‘एल निनो’चा प्रभाव जूनपासूनच मान्सूनवर पडू लागल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. देशात एक ते १६ जूनदरम्यान सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये पावसाची तूट ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. वातावरणात तीन किलोमीटरच्या वर वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे अरबी समुद्र आणि लगतच्या राज्यांमध्ये ढगांच्या निर्मितीत अडथळे निर्माण झाले आहेत.

प्रशांत महासागरात विकसित झालेल्या ‘एल निनो’मुळे वाऱ्यांच्या जागतिक प्रवाहांमध्ये बदल होऊन मोसमी वाऱ्यांचा प्रवाह क्षीण झाला आहे. ‘एमजेओ’ दीर्घकाळ प्रशांत महासागरावर सक्रिय राहणे आणि मोसमी वाऱ्यांचा प्रवाह क्षीण होणे हा ‘एल निनो’चा मान्सूनवर झालेला परिणाम म्हणता येईल. - डॉ. रॉक्सी कोल, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटीएम

टंचाईग्रस्त राज्यांकडे लक्ष देण्याचे निर्देश

नवी दिल्ली

समुद्रातील तापमान आणि वायूमंडळाच्या स्थितीमधील बदलामुळे (एल-निनो)  मान्सूनचा पाऊस लांबला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एल-निनो’चा सर्वाधिक फटका बसणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचनाही चौहान यांनी मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिल्या.

केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले...

पिकांच्या हिशेबाने राज्यांनी पर्यायी योजना तयार करावी.

  संवेदनशील जिल्ह्यांसाठी वेगळी रणनीती.

  पिकांच्या पर्यायी व्यवस्थेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे.

  वैज्ञानिक विश्लेषणावर भर द्यायला हवा.

  कापूस तसेच डाळवर्गीय पिकांच्या लागवडीवर भर देण्याची गरज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT