Devotees offer namaz at Jama Masjid  ANI
देश

ईद मुबारक! देशभरात ईद उल फित्र उत्साहात साजरा केला जातोय

दोन वर्षांनंतर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज अदा करतांना दिसलेत

Priyanka Deshmukh

ईद-उल-फित्रचा (Eid-ul-Fitr) सण आज भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास दोन वर्षांनंतर, मंगळवारी ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दिल्लीच्या जामा मशिदीत नमाज अदा करतांना दिसलेत. रविवारी दिल्लीसह देशाच्या कोणत्याही भागात ईदचा चंद्र दिसत नसताना मंगळवारी ईद-उल-फित्रचा सण साजरा करण्याची घोषणा करण्यात आली . दुसरीकडे , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासियांना ईद-उल-फित्रच्या एक दिवस आधी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना चांगले आरोग्य आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ईद-उल-फित्रच्या अनेक अनेक शुभेच्छा. या शुभ सोहळ्याने आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढीस लागो. मी सर्वांना चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थनाकरतो.' त्याचवेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Devotees offer namaz at Jama Masjid)

ईदनिमित्त जामा मशीद परिसरात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून आली

दुसरीकडे, दोन वर्षानंतर ईदच्या आधी रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या जामा मशीद परिसरात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून आली. स्थानिक तसेच शहराच्या इतर भागातील लोक जामा मशिदीच्या आजूबाजूच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये खाद्यपदार्थ, कपडे आणि बूट खरेदी करण्यासाठी जमले. चितळी काबर बाजार येथील एका स्थानिक दुकानदाराने सांगितले की, कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत लोक ईद साजरी करू शकले नाहीत. या वर्षी बहुतेक कोविड निर्बंध उठवण्यात आले आहेत, त्यामुळे ते आता ईदसाठी सामान खरेदी करत आहेत.तसेच मुंबईच्या माहीम दर्गा येथेही मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली

'ईदच्या खरेदीवर लोक पूर्वीसारखे पैसे खर्च करत नाहीत'

मात्र काही दुकानदारांनी असेही सांगितले की खरेदीदार कोविडच्या आधी ते ज्या प्रकारे पैसे खर्च करत होते तसे आता दिलखुलासपणे पैसे खर्च करत नाही. लोक उपवास सोडण्यासाठी खाद्यपदार्थ खरेदी करत असल्याने गर्दीही वाढल्याचे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय राजधानीत कोविडच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाही, अनेक दुकानदार तसेच खरेदीदार मास्क घातलेले दिसले. दिल्ली सरकारने कोविडशी संबंधित जवळजवळ सर्व निर्बंध हटवले आहेत, परंतु संसर्गाची संख्या वाढल्यामुळे, मास्क घालण्याचा नियम गेल्या महिन्यात पुन्हा लागू करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT