ED Summons American Millionaire Neville Singham in News Click Terror case
ED Summons American Millionaire Neville Singham in News Click Terror case Twitter/ @ani_digital
देश

News Click Case: न्यूजक्लिक प्रकरणात ED चे नेव्हिल रॉय सिंघमला समन्स; भारताविरुद्ध कट रचल्याचा...

Manish Jadhav

News Click Case: न्यूज क्लिक प्रकरणी शांघायस्थित अमेरिकन अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघमला ईडीने समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने हे समन्स परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाठवले आहे. गेल्या वेळी चीनने ईडीला हे समन्स जारी करण्यापासून रोखले होते.

दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना गेल्या महिन्यात अटक केली होती. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, आरोपी भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता भंग करण्याचा कट रचत होते.

यापूर्वी 7 ऑक्टोबर रोजी सीबीआयने न्यूजक्लिकच्या दिल्लीतील कार्यालयावर छापा टाकला होता. सीबीआयने या प्रकरणात न्यूक्लिक प्रायव्हेट लिमिटेड, पुरकायस्थसह सिंघमलाही सहआरोपी केले आहे. विशेष म्हणजे, या अवैध विदेशी निधीची सीबीआय, ईडी आणि दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

न्यूजक्लिकला 28.46 कोटी रुपये मिळाले

सीबीआयचा (CBI) आरोप आहे की, सिंघमने भारताच्या एफसीआरए तरतुदींचे उल्लंघन करुन चार विदेशी संस्थांद्वारे न्यूजक्लिकला 28.46 कोटी रुपयांचा निधी दिला होता. या प्रकरणी न्यूजक्लिकने एक निवेदन जारी करुन म्हटले की, 'त्यांनी कोणत्याही चिनी कंपनी किंवा व्यक्तीच्या आदेशानुसार कधीही कोणतीही बातमी प्रकाशित केलेली नाही.'

आम्ही सर्व पैसे कायदेशीररित्या घेतले असल्याचे पोर्टलने म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, त्यांनी पीपल्स अलायन्स नावाच्या गटाशी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मुद्दे भडकवण्याचा कट रचला आणि शेल कंपन्यांना परकीय पैशासाठी निधी उपलब्ध करुन दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: गोव्यात चार वर्षात 149 सराईत गुन्हेगारांची नोंद; आलेमाव यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

एक खड्डा दुरुस्तीसाठी 16 हजार तर, लाडूंसाठी 40 लाख खर्च; गोवा सरकारची लूट सुरु असल्याचा सरदेसाईंचा आरोप

Goa Assembly Monsoon Session 2024 Today Live: मुरगाव पोलीस ठाण्याची अवस्था दयनीय, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज

Goa To Vailankanni Special Train: गोव्याहून वालंकन्नीला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी विशेष गाड्या द्या! फर्नांडिस यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Goa Assembly: ''गोव्यात लोक किड्यामुंग्यांसारखे मरतायेत, अपघातांच्या घटनांमध्ये कमालीचे वाढ''; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT