ED Raid On KCR's Minister Dainik Gomantak
देश

ED Raid On KCR's Minister: मंत्री फिरताहेत दुबईत; इकडे 'ईडी'चे घर, कार्यालयांवर छापे

तेलंगणात पुन्हा भाजप विरूद्ध टीआरएस संघर्ष तापणार; बेकायदा उत्खनन आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा

गोमन्तक डिजिटल टीम

ED Raid On KCR's Minister: बेकायदा उत्खनन आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) तेलंगणातील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मंत्रीमंडळातील सहकार मंत्री गंगुला कमलाकर यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत.

गंगुला कमलाकर यांच्याकडे मागासवर्ग कल्याण, खाद्य आणि नागरी पुरवठा ही खातीदेखील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीची ही कारवाई मंत्री गंगुला कमलाकर या कुटूंबासह दुबईत असताना झाली आहे. या कारवाईमुळे भाजप आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेला संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. केसीआर यांनी यापुर्वीच केंद्र सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांना मुद्दाम त्रास देण्यासाठी गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला होता.

मुनुगोडे येथील विधानसभा पोटनिवडणुकीच्या एका आठवड्यानंतर ईडीतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपला टीआरएसकडून पराभव स्विकारावा लागला होता. भाजप उमेदवार कोमाटिरेड्डी राज गोपाल रेड्डी पराभूत झाले होते. रेड्डी यांची एक मोठी उत्खनन कंपनी आहे.

केंद्र सरकारने टीआरएसच्या चार आमदारांना पक्ष बदलण्यासाठी लाच दिल्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही टीआरएस पक्षाकडून करण्यात आला आहोता. भाजपने मात्र हे आरोप फेटाळले असून केंद्रीय तपास यंत्रणा किंवा न्यायालयाच्या निगराणीखालील विशेष तपास पथकाकडून स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: ‘ॲपल’वरती मस्क चिडले! ‘ॲप’ची शिफारस न केल्याप्रकरणी दाखल करणार दावा; Xवर व्यक्त केली नाराजी

Goa Live News: डिचोलीमधील माणसाची ४.६८ लाख रुपयांची फसवणूक

Gambling Fines: 75 लाखांचा दंड होणार! जुगाराबाबत कडक नियम; अटींचे उल्लंघन केल्यास बसणार मोठा फटका

Socorro: ‘नीज गोंयकारा’चे घर पाडले, सरकारने नुकसान भरपाई द्यावी; कुळ मुंडकार संघर्ष समितीची मागणी

Goa Pregnancy Termination: 5 वर्षांत राज्यात 9627 जणींचे गर्भपात, रोज सरासरी पाच केसेस; केंद्रीय मंत्री पटेल यांची माहिती

SCROLL FOR NEXT