Sonia Gandhi and Rahul Gandhi
Sonia Gandhi and Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

National Herald Case: सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीकडून मोठा झटका, यंग इंडियाची 751 कोटींची मालमत्ता जप्त

Manish Jadhav

ED Attaches Assets in National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना मोठा झटका दिला.

ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे मुखपत्र नॅशनल हेराल्डशी संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडियाची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

एका निवेदनात, एजन्सीने म्हटले की, त्यांच्या तपासादरम्यान दिल्ली, मुंबई आणि लखनऊ सारख्या भारतातील अनेक शहरांमध्ये पसरलेल्या स्थावर मालमत्तेच्या रुपात AJL चे 661.69 कोटी रुपयांचे उत्पन्न असल्याचे समोर आले आहे. मेसर्स यंग इंडियन (YI) चे AJL च्या इक्विटी शेअर्समधील गुंतवणुकीद्वारे 90.21 कोटी रुपयांचे उत्पन्न आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभा व्हिप मणिकम टागोर यांनी 'X' वर पोस्ट केले - "पनौती मोदींनी ईडीला नॅशनल हेराल्डची मालमत्ता बेकायदेशीरपणे जप्त करण्याचे आदेश दिले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये त्यांचा पराभव होईल.

एका खाजगी तक्रारीची दखल घेत न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने तपास सुरु केला होता. न्यायालयाने असे मानले की, सात आरोपींनी प्रथमदर्शनी फसवणूक करुन आणि अप्रामाणिकपणे मालमत्ता मिळवून गुन्हेगारी कट रचला.

निवेदनात म्हटले आहे की, आरोपींनी यंग इंडियाच्या माध्यमातून एजेएलची शेकडो कोटी रुपयांची संपत्ती मिळवण्याचा गुन्हेगारी कट रचला होता. AJL ला वृत्तपत्र प्रकाशित करण्याच्या उद्देशाने भारतातील विविध शहरांमध्ये सवलतीच्या दरात जमीन देण्यात आली होती, परंतु 2008 मध्ये त्यांनी त्याचे प्रकाशन बंद केले.

त्यानंतर या मालमत्तेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होऊ लागला. यातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला (AICC) 90.21 कोटी रुपये मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही, ईडीने सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. असे म्हटले जाते की, 2010 मध्ये एजेएलचे 1057 शेअर होल्डर होते.

दरम्यान, तोटा झाल्याने त्याचे होल्डिंग YIL कडे हस्तांतरित करण्यात आले. त्याचवर्षी, यंग इंडिया लिमिटेडची सुरुवात झाली होती. त्यावेळी काँग्रेस (Congress) पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी त्यात संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांची कंपनीत 76 टक्के भागीदारी होती. त्यांच्या आई सोनिया गांधी यांचाही यात सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT