Bengal Minister Partha Chatterjee & Arpita Mukherjee  Dainik Gomantak
देश

शिक्षक भरती घोटाळा: मंत्री पार्थ चॅटर्जींना दोन दिवसांची ED कोठडी

Bengal Minister Partha Chatterjee: पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांना कोलकाता येथील बँकशाल न्यायालयात हजर केले.

दैनिक गोमन्तक

Bengal Minister Partha Chatterjee & Arpita Mukherjee: कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ED) शनिवारी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी (Bengal Minister Partha Chatterjee) यांना कोलकाता येथील बँकशाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चॅटर्जी यांना दोन दिवसांची ईडी सुनावली.

तर दुसरीकडे, चॅटर्जी यांच्यानंतर त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जीलाही (Arpita Mukherjee) अटक करण्यात आली आहे. अर्पिता यांच्या घरी 21 कोटींची रोकड मिळाली होती. नोटा मोजण्यासाठी बँकांकडून (Banks) मशिन मागवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारमधील एक दिग्गज मंत्री आहेत. चॅटर्जी कथित घोटाळ्याच्या वेळी राज्याचे शिक्षण मंत्री होते. सुमारे 26 तासांच्या चौकशीनंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने (Court) पार्थ चॅटर्जी यांना दोन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

अर्पितालाही अटक

पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनंतर तपास यंत्रणेने काल रात्री सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी अर्पिता यांच्या घरातून 21 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. या रकमेत 500 आणि 2000 च्या नोटा होत्या. त्यानंतर अर्पिता यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती ईडीच्या (ED) सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुखर्जी यांच्या घरातून सुमारे 20 मोबाईल फोन आणि काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

नोटा नेण्यासाठी ट्रक आणावा लागला

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने काल संध्याकाळी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात 21 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली. नोटा मोजण्यासाठी बँकेतून मशिन मागवण्यात आल्या. आतापर्यंत 21.20 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. इतकंच नाही तर ईडीच्या अधिकाऱ्यांना नोटा घेऊन जाण्यासाठी ट्रक बोलवावा लागल्याच्या बातम्या येत आहेत. या नोटा बॉक्समध्ये भरुन नेल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT