Karnataka Mla Satish Sail Arrest Dainik Gomantak
देश

MLA Satish Sail Arrest: ED ची मोठी कारवाई! कर्नाटकच्या आमदारांना अटक; अवैध खनिज निर्यातीचा ठपका

Karnataka Mla Satish Sail Arrest: बेकायदा लोह खनिज निर्यात प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत कर्नाटकातील कारवार येथील आमदार सतीश सैल यांना अटक केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा व कर्नाटकमधील बेकायदा लोह खनिज निर्यात प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत कर्नाटकातील कारवार येथील आमदार सतीश कृष्णा सैल यांना अटक केली आहे.

बेंगळुरूतील विशेष न्यायालयाने आमदार सैल यांना तीन दिवसांची ईडी कोठडी दिली असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत करण्यात आली.

तपासांतर्गत ईडीने १३ व १४ ऑगस्ट रोजी गोवा, कारवार (उत्तर कन्नड), होस्पेट, मुंबई व नवी दिल्ली येथे एकाच वेळी छापेमारी केली होती. या धाडीत महत्त्वाची कागदपत्रे, ई-मेल्स, आर्थिक नोंदी जप्त करण्यात आल्या. तसेच १.६८ कोटी रुपये रोख, ६.७५ किलो सोन्याची बिस्किटे व दागिने (किंमत अंदाजे ६.५८ कोटी रुपये) आणि १४.७३ कोटी रुपयांचे बँक खाते गोठवण्यात आले होते.

ईडीच्या बेंगळुरू कार्यालयाने ९ सप्टेंबर रोजी आमदार सैल यांना ताब्यात घेतले. याआधी विशेष न्यायालयाने या प्रकरणी आमदार सैल यांच्यासह १२ जणांना दोषी ठरवले होते. वनखात्याने जप्त केलेल्या लोह खनिजाचा बेकायदेशीर निर्यातीत समावेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या बेकायदेशीर व्यवहारामुळे सरकारला तब्बल ८६.७८ कोटींचा महसुली तोट्याचा फटका बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT