Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

Cruz Silva Allegations: आप’च्या उमेदवारावर आरोप करण्यापूर्वी काँग्रेसने त्यांचे निवडून आलेल्या सदस्यांची चौकशी करावी. हे मतदान गुप्त व मतपत्रिकेद्वारे झाले.
Cruz Silva
Cruz Silva Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निवडणुकीत भाजपला १५ ऐवजी १६ मते पडली त्यावरून जे क्रॉस मतदान झाले त्यावर आपचे वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी त्यात कॉंग्रेसचाच हात आहे, असा आरोप केला आहे.

आप’च्या उमेदवारावर आरोप करण्यापूर्वी काँग्रेसने त्यांचे निवडून आलेल्या सदस्यांची चौकशी करावी. हे मतदान गुप्त व मतपत्रिकेद्वारे झाले. अशा परिस्थितीत काँग्रेस चे नेते आम आदमी पक्षाच्याच सदस्याने क्रॉस व्होटींग केले, असे कसे म्हणू शकतात, असा प्रश्न सिल्वा यांनी उपस्थित केला.

कॉंग्रेसच्या दक्षिण गोवा समितीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा जर त्यांच्या नऊ ही सदस्यांना घेऊन येत असेल तर आमचा कोलवा सदस्य आंतोनियो फर्नांडिस कुठल्याही मंदिरात, चर्चमध्ये येऊन शपथ घ्यायला तयार आहे.

लोकांचा काँग्रेसवरील विश्वास उडालेला आहे. त्यांनी जे उमेदवार दिले ते सर्व कुठे मूळ कॉंग्रेसचे होते?, दुसऱ्या पक्षातून आयात करुन काहींना उमेदवारी देण्यात आली होती. या उमेदवारांनी नेमके काय केले याची चौकशी कॉंग्रेसने करणे गरजेचे आहे, असेही क्रुझ सिल्वा यांनी सांगितले. यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन व शपथ घेऊनही पक्ष बदललेली प्रकरणे ताजी आहेत.

Cruz Silva
Goa Politics: खरी कुजबुज; काय? काणकोणकरांना तिसरा जिल्हा नकोय?

त्यामुळे काँग्रेसने ‘आप’ला शहाणपण शिकवू नये. त्यांनी उमेदवारी दिलेले उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप बरोबर होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आम आदमी पक्ष कधीही भाजप बरोबर नव्हता व यापुढेही नसेल, आम्ही भाजपवरच टीका करीत आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Cruz Silva
Goa Politics: काँग्रेस नेत्यांमध्ये कुठ्ठाळीत राडा! 'गेट आऊट' म्हणत नेत्याने गटाध्यक्षाला बदडले, सिमोईस यांच्या विरोधात तक्रार दाखल

विजय नसला तरी, लढत दिली!

आम्ही या निवडणुकीत वेळ्ळी, नावेली, कुडतरी इथे स्वच्छ, प्रामाणिक उमेदवार दिले होते. आम्ही प्रयत्न केले, विजय मिळाला नसला तरी लढत दिली, असेही क्रुझ सिल्वा यांनी सांगितले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ज्या चुका झाल्या, त्या सुधारून सामोरे जाणार आहोत. त्याच निवडणुकीत नेमके कोणता पक्ष संपला याची प्रचिती येईल, असेही आमदार क्रुझ सिल्वा यांनी शेवटी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com