शनिवारी रात्री उशिरा मिझोरामच्या (Mizoram) आयझॉलमध्ये (Aizawal) भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची (Earthquake) तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (National Center for Seismology), रात्री 12:49 च्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांमुळे पृथ्वी हादरली. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
यापूर्वी 29 नोव्हेंबरला मिझोराममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली होती की, राज्यातील चंफई जिल्ह्याजवळ 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. त्यांच्या मते भूकंपाचा केंद्रबिंदू चांफईपासून 69 किमी दक्षिणेला होता. भारताच्या वेळेनुसार सायंकाळी 6.54 वाजता हा भूकंप जमिनीच्या खाली 54 किमी खोलीवर आला.
गुजरातमध्ये ८ डिसेंबरला भूकंप झाला
त्याच वेळी, 8 डिसेंबर रोजी, गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील गोंडल शहरात भूकंप झाला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 मोजली गेली. या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी 6:53 च्या सुमारास भूकंपाची नोंद करण्यात आली, त्यानंतर त्याच भागात सौम्य हादरेही जाणवले, ज्याची तीव्रता 2 एवढी मोजण्यात आली होती. राजकोटचे जिल्हाधिकारी अरुण महेश बाबू यांनी पुष्टी केली की भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
6 डिसेंबर रोजी म्यानमारमधील मोगोक येथे भूकंप
यापूर्वी 6 डिसेंबर रोजी म्यानमारमधील मोगोक येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.0 इतकी मोजली गेली होती. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने ही माहिती दिली आहे. भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मोगोकच्या वायव्येस 72 किमी खोलीवर होता. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नसले तरी यापूर्वी 26 नोव्हेंबर रोजी म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. म्यानमार-भारत सीमेवर झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजली गेली होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.