Earthquake Dainik Gomantak
देश

Earthquake In Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 2.7 ची नोंद

Earthquake In Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.7 इतकी मोजली गेली आहे.

Manish Jadhav

Earthquake In Delhi-NCR: भूकंपामुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी झालेल्या भूकंपाचे धक्के अजूनही लोकांना विसरता आले नव्हते की, बुधवारी पुन्हा दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.7 इतकी मोजली गेली आहे.

भूकंपाचे सौम्य धक्के

बुधवारी दुपारी 4.42 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये 2.7 रिश्टर स्केलचे सौम्य धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा हादरा बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा भूकंप (Earthquake) आला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपामुळे प्रभावित झालेले ठिकाण पश्चिम दिल्ली आहे.

मंगळवारीही भूकंपाचे धक्के जाणवले

मंगळवारी रात्रीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, लोक घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी होती.

दिल्लीशिवाय पंजाब (Punjab), उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावरमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. येथेही लोक घराबाहेर पडले.

जगात दरवर्षी सुमारे 20 हजार भूकंप होतात.

जगात दरवर्षी सुमारे 20,000 भूकंप होतात, परंतु त्यांची तीव्रता इतकी जास्त नसते की, लोकांचे मोठे नुकसान होईल. माहितीनुसार, 20 हजारांपैकी केवळ 100 भूकंप असे आहेत की, ज्यामुळे नुकसान होते. रेकॉर्ड केलेल्या इतिहासातील सर्वात जास्त काळ टिकणारा भूकंप 2004 मध्ये हिंदी महासागरात झाला होता. हा भूकंप 10 मिनिटे जाणवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT