Gujarat Earthquake  Dainik Gomantak
देश

Earthquake: अमृतसरसह पंजाबच्या काही भागात भूकंपाचा जोरदार धक्का, रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पंजाब, पाकिस्तानमध्ये होता. भूकंपाची खोली 120 किमी असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमन्तक

अमृतसरसह पंजाबच्या (Panjab) काही भागात आज सकाळी 3:42 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पंजाब, पाकिस्तानमध्ये होता. भूकंपाची खोली 120 किमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी शनिवारी नेपाळमध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) ते उत्तराखंडपर्यंत जाणवले . हा भूकंप उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पूर्व-दक्षिणपूर्व 101 किमी अंतरावर झाला. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याआधी, शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजता उत्तराखंडमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू पौरी गढवाल प्रदेशात होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, 8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंड-नेपाळ सीमेला लागून असलेल्या हिमालयीन प्रदेशात वेगवेगळ्या तीव्रतेचे किमान आठ भूकंप झाले आहेत. पिथौरागढचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बीएस महार यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या सिलांग शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर होता, मात्र त्याचे धक्के भारत, चीन आणि नेपाळमध्ये जाणवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT