Earthquake Dainik Gomantak
देश

Earthquake: अफगाणिस्तानपासून नोएडपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के

रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 5.7 मोजली गेली

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्ताना, काश्मीर, नोएडा आणि इतर भागात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 5.7 मोजली गेली. आज सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान- ताजिकिस्तान सीमा भागात होता. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

शनिवारी सकाळी अफगाणिस्तानात (Afghanistan) 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा (Earthquake) धक्का बसल्यानंतर जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआर आणि इतर भागात जोरदार हादरे जाणवले आहेत, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) सांगितले. भूकंप सकाळी 9:46 च्या सुमारास झाला आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 181 किलोमीटर खोलीवर होता. अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

नोएडातील (Noida) काही लोकांनी ट्विट केले की किमान 20 सेकंड जमीन हादरली. दिल्लीतील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले आहे. एका व्यक्तीने सांगितले, "मला माझे डोके फिरत असल्याचे जाणवले. जेव्हा मी पंख्याकडे पहिले तेव्हा तो अचानक थरथरत होता. मला वाटले की हा भूकंप आहे. नोएडमध्ये सुमारे 25-30 सेकंदापर्यंत जोरदार हादरे जाणवले.

* गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामुळे कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. रापर गावात भूकंपाचा केंद्रबिंदु होता. गांधीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मिक रिचर्सने सांगितले की, शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास कच्छच्या रापरमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. भूकंपामुळे या भगात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समजले नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते. कच्छ जिल्हा हा भूकंपाच्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2001 मध्ये भूकंपामुळे कच्छचे मोठे नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT