Earthquake In Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. शुक्रवारी सकाळी 10.28 वाजता सूरजपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू भातगावपासून 11 किमी अंतरावर आहे. छत्तीसगडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. उत्तर छत्तीसगडमध्ये गेल्या 10 महिन्यांतील हा सहावा भूकंप आहे.
सुरगुजा विभागात भूकंपाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे तेथील स्थानिक लोकांनी सांगितले.
भीतीमुळे लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने अनेकांना त्याची माहिती मिळू शकली नाही.
भूकंपामुळे कुठलीही हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, घटना घडल्यानंतर अंबिकापूर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही तात्काळ वर्गाबाहेर सोडण्यात आले.
यापूर्वी 10 ऑक्टोबर 2022 रोजी शुक्रवारी पहाटे 5.28 वाजता 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू बैकुंठपूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या गेज धरणाजवळ होता.
यापूर्वी, 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.57 वाजता 3.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचा केंद्रबिंदू सूरजपूरपासून 11 किमी अंतरावर आणि पृष्ठभागापासून 10 किमी खाली होता.
तसेच, त्याआधी 29 जुलै 2022 रोजी बैकुंठपूरला लागून असलेल्या सोनहाट भागात 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता.
यादरम्यान चरचा भूमिगत खाणीत झालेल्या स्फोटामुळे डझनभर मजूर जखमी झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू बैकुंठपूरजवळील सोनहट भागात भूपृष्ठापासून 16 किमी खोलीवर होता.
यापूर्वी दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे धक्के जाणवेल. याप्रकरणी बस्तरचे खासदार दीपक बैज यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात लोक 7व्या मजल्यावरून पायऱ्यांवरून खाली पळताना दिसले.
21 मार्च रोजी रात्री 10.17 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल इतकी होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.