Ram Mandir|Tax Collection In UP Dainik Gomantak
देश

Ram Mandir: कर संकलनामुळे उत्तर प्रदेश होणार मालामाल, वर्षभरात मिळणार 25 हजार कोटींपेक्षा जास्त कर

Tax Collection in Ayodhya: सौदी अरेबियाला दरवर्षी मक्काला भेट देणाऱ्या 20 दशलक्ष यात्रेकरूंकडून 12 अब्ज डॉलर्सचे वार्षिक उत्पन्न मिळते, तर व्हॅटिकन सिटीला तेथे भेट देणाऱ्या 9 दशलक्ष लोकांकडून 315 दशलक्ष डॉलर्सचे वार्षिक उत्पन्न मिळते.

Ashutosh Masgaunde

Due to Ram Mandir Uttar Pradesh will be rich due to tax collection, tax will be more than 25 thousand crores in a year:

अयोध्या धाम आणि श्री राम मंदिर हे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. स्टॉक रिसर्च फर्म जेफरीजने दावा केला आहे की, व्हॅटिकन सिटी आणि मक्कापेक्षा पाच कोटी अधिक भाविक वर्षभरात अयोध्येला भेट देतील.

दरवर्षी 20 दशलक्ष भाविक मक्का आणि 90 लाख भाविक व्हॅटिकन सिटीला भेट देतात. एसबीआयच्या संशोधनानुसार, अयोध्येमुळे उत्तर प्रदेशला एका वर्षात 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त कर संकलनाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सोमवारी श्री राम लल्लाचा अभिषेक झाल्यानंतर अयोध्या धाम उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी संधी बनणार आहे.

आगामी काळात उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संकल्प पूर्ण करण्यात अयोध्या मोठी भूमिका बजावेल.

राम मंदिर पुढील एक हजार वर्षे अबाधित

राम मंदिर पुढील एक हजार वर्षे अबाधित राहील, असा दावा मंदिराच्या उभारणीत सहभागी असलेल्या लार्सन अँड टुब्रो या कंपनीने केला आहे. त्याचे अभियांत्रिकी आणि डिझाइन अशा प्रकारे केले गेले आहे की, हजार वर्षांहून अधिक काळ त्याच्या संरचनेला कोणतेही नुकसान होणार नाही.

SBI रिसर्चने एका अहवालात दावा केला आहे की, राम मंदिर आणि इतर पर्यटन क्रियाकलापांमुळे उत्तर प्रदेशला 2024-25 मध्ये 25,000 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर संकलन अपेक्षित आहे. यात अयोध्या मोठी भूमिका बजावणार आहे. असा दावा केला जात आहे की, पर्यटन वाढल्यामुळे उत्तर प्रदेशला यावर्षी सुमारे 4,00,000 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर देशातील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. यातून राज्याला1,200 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. येथे दरवर्षी अडीच कोटी भाविक येतात. त्याचप्रमाणे दरवर्षी 80 लाख भाविक वैष्णोदेवीला भेट देतात, यातून तेथील सरकारला 500 कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

त्याच वेळी, दरवर्षी ताजमहाल आणि आग्राच्या किल्ल्याला भेट देणाऱ्या एक कोटी लोकांकडून सरकारला 127.5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळते.

सौदी अरेबियाला दरवर्षी मक्काला भेट देणाऱ्या 20 दशलक्ष यात्रेकरूंकडून 12 अब्ज डॉलर्सचे वार्षिक उत्पन्न मिळते, तर व्हॅटिकन सिटीला तेथे भेट देणाऱ्या 9 दशलक्ष लोकांकडून 315 दशलक्ष डॉलर्सचे वार्षिक उत्पन्न मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT