India overtakes Hong Kong to take fourth place, in World's Largest Stock Markets:
भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच हाँगकाँगला मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग डेटानुसार, सोमवारी भारतीय एक्सचेंजेसवर सूचीबद्ध स्टॉकचे एकत्रित मूल्य $4.33 ट्रिलियनवर पोहोचले. तर, हाँगकाँगसाठी हा आकडा $4.29 ट्रिलियन होता. यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इक्विटी मार्केट बनले आहे.
5 डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजाराचे मार्केट कॅप प्रथमच $4 ट्रिलियनच्या पुढे गेले. यापैकी सुमारे $2 ट्रिलियन गेल्या चार वर्षांत आले. वेगाने वाढणारा किरकोळ गुंतवणूकदार आणि मजबूत कॉर्पोरेट कमाई यामुळे भारतातील स्टॉक्स वेगाने वाढत आहेत.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाने चीनला पर्याय म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भारतीय बाजारपेठ आता जागतिक गुंतवणूकदार आणि कंपन्यांकडून नवीन भांडवल आकर्षित करत आहे.
चीनचे कठोर कोविड-19 निर्बंध, कॉर्पोरेशनवरील नियामक कारवाई, मालमत्ता क्षेत्रातील संकट आणि पाश्चिमात्य देशांसोबतचा भू-राजकीय तणाव यामुळे जगाच्या वाढीचे इंजिन म्हणून चीनच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. चिनी आणि हाँगकाँगच्या समभागांचे एकूण बाजार मूल्य 2021 मध्ये त्यांच्या सर्वोच्च शिखरापासून $6 ट्रिलियन पेक्षा जास्त घसरले आहे.
हाँगकाँगमध्ये कोणतेही नवे स्टॉर्स सूचीबद्ध होत नाहीत. आयपीओ हबसाठी जगातील सर्वात व्यस्त ठिकाणांपैकी एक म्हणून ते आपले स्थान गमावत आहे.
बर्नस्टीनला या महिन्याच्या सुरुवातीला चिनी बाजारपेठेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. 2023 मध्ये चार वर्षांची विक्रमी घसरण थांबवल्यानंतर हाँगकाँगचा हँग सेंग चायना एंटरप्राइजेस इंडेक्स आधीच सुमारे 13% खाली आहे. तर, भारताचे बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड-उच्च पातळीच्या जवळ व्यवहार करत आहेत.
लंडनस्थित थिंक-टँक ऑफिशियल मॉनेटरी अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स फोरमच्या अलीकडील अभ्यासानुसार, 2024 मध्ये परदेशी फंड भारतीय इक्विटीमध्ये $21 अब्जपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहेत, ज्यामुळे देशाच्या बेंचमार्क S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकाला सलग आठव्या वर्षी फायदा झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.