Draupadi Murmu Oath Twitter
देश

Draupadi Murmu Oath: द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ,15 व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान

Draupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 25 जुलै रोजी राष्ट्रपती म्हणून (Draupadi Murmu Oath) शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा समारंभ पार पडला. द्रौपदी मुर्मू यांना सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. (Draupadi Murmu Oath Ceremony News)

रामनाथ कोविंद यांनी द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रपति भवनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवनिर्वाचित राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले होते. शपथविधी सोहळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीर रमणा, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या, 'मी स्वतंत्र भारतात जन्मलेली देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. जमतेचे कल्याण हेच माझे ध्येय आहे. पुढे त्या म्हणाल्या पुढील काळात जलद गतीने काम करणार. मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली महिला राष्ट्रपती, जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय आहे असे त्या म्हणाल्या.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा, अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT