Draupadi Murmu
Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांनी रचले पाच विक्रम, वाचा सविस्तर

दैनिक गोमन्तक

Presidential Election 2022: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून उमेदवारी दिली होती. त्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारे आणि प्रादेशिक राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यापासून द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आता नव्या अध्यक्षांच्या खात्यात अनेक नवे विक्रम जमा झाले आहेत.

दरम्यान, देशाच्या 15 व्या राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्मूंच्या (Draupadi Murmu) नावावर 5 नवे विक्रम नोंदवले गेले आहेत. चला तर मग, मुर्मू यांनी बनवलेल्या त्या 5 विक्रमांवर एक नजर टाकूया…

स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले राष्ट्रपती

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून द्रौपदी मुर्मू यांनी सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनल्या आहेत. याआधी देशातील आतापर्यंतचे सर्व राष्ट्रपती हे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी जन्मलेले नेते आहेत. 24 जुलै रोजी निवृत्त होणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांचाही जन्म 1947 पूर्वी झाला होता. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. कोविंद यांच्या आधीच्या सर्व राष्ट्रपतींचा जन्म स्वातंत्र्याच्या दोन दशकांपूर्वी म्हणजेच 1930 पूर्वी झाला होता.

दुसरीकडे, 20 जून 1958 रोजी जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू देखील स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या यादीत सामील झाल्या आहेत. सध्या देशाच्या दोन्ही सर्वोच्च पदांवर 1947 नंतर जन्मलेल्या नेत्यांचा वरचष्मा आहे.

तसेच, 15 ऑगस्ट 1947 ते 2014 पर्यंत देशाची दोन्ही सर्वोच्च पदे (राष्ट्रपती आणि पंतप्रधान) भूषवणाऱ्या सर्व नेत्यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला होता. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर स्वतंत्र भारतात जन्मलेले मोदी हे पहिले पंतप्रधान बनले.

देशाला सर्वात तरुण राष्ट्रपती मिळाले

राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वात तरुण राष्ट्रपती ठरल्या आहेत. 20 जून 1958 रोजी जन्मलेल्या मुर्मू आता 64 वर्षांचे आहेत. 25 जुलै रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्या 64 वर्षे, 1 महिना आणि 8 दिवसांच्या होतील. या अर्थाने त्या काही दिवसांच्या फरकाने हा विक्रम आपल्या नावावर करतील. आत्तापर्यंत देशातील सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता, ते 1977 च्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते. 25 जुलै 1977 रोजी राष्ट्रपतीपद स्वीकारणारे रेड्डी हे तत्कालीन सर्वात तरुण राष्ट्रपती बनले होते. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्षे 2 महिने 6 दिवस होते. देशाच्या सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपतींचे नाव के.आर नारायणन आहे. नारायणन यांनी 25 जुलै 1997 रोजी वयाच्या 77 वर्षे 5 महिने, 21 दिवसांनी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.

पहिला आदिवासी नेता जो राष्ट्रपती असेल

द्रौपदी मुर्मू या आदिवासी नेत्या आहेत. के. आर नारायणन आणि रामनाथ कोविंद यांच्या रुपाने देशाला आतापर्यंत दोन दलित राष्ट्रपती मिळाले आहेत. मात्र आदिवासी समाजातील कोणताही नेता सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकला नव्हता. आदिवासी समाजातून देशाला ना पंतप्रधान मिळाला ना राष्ट्रपती. देशातील इतर सर्वोच्च पदे म्हणजे गृहमंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री आदिवासी समाजाला मिळाले नाहीत. परंतु आता मुर्मू यांनी राष्ट्रपती बनून इतिहास रचला.

तसेच, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत, ज्या देशाच्या राष्ट्रपती बनल्या. मुर्मू यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या राज्यपाल होत्या. झारखंडमध्ये (Jharkhand) राज्यपाल म्हणून कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला असल्याने त्यांनी राज्यपाल म्हणूनही इतिहास रचला.

सर्वोच्च पदावर पोहोचलेले देशातील पहिले नगरसेवक

देशाच्या इतिहासात राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. द्रौपदी मुर्मू या पहिल्या नेत्या बनल्या ज्या पहिल्या नगरसेवक होत्या आणि आता राष्ट्रपती बनल्या. ओडिशामध्ये (Odisha) जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बीएची पदवी मिळवली. शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मुर्मू यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणातही त्यांनी खूप यश मिळवले. मुर्मू 1997 साली नगरसेवक झाल्या, तीन वर्षांनी 2000 मध्ये त्या पहिल्यांदा आमदार बनल्या. दरम्यान, त्या राज्यातील भाजप-बीजेडी सरकारमध्ये दोन वेळा मंत्रीही होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT