New Delhi: आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा 'राष्ट्रपिता' आणि 'राष्ट्र ऋषी', असा उल्लेख करणाऱ्या ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे (AIIO) प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. परदेशातून धमकीचे फोन आल्याचे इलियासी यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, 'मला इंग्लंडहून फोन करुन एका व्यक्तीने आधी नाराजी व्यक्त केली, नंतर अपशब्द वापरले आणि शेवटी धमकी दिली.'
मुख्य इमाम इलियासी म्हणाले की,'पोलिस ठाण्यात धमकीची तक्रार मी दिली आहे, तसेच सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनाही याबद्दल अवगत केले आहे.' मुख्य इमाम इलियासी यांना आधीपासूनच सुरक्षा आहे.
भागवत आणि इलियासी यांची 22 सप्टेंबर रोजी भेट झाली होती
22 सप्टेंबर रोजी दिल्लीतील (Delhi) कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि डॉ उमर अहमद इलियासी यांच्यात बैठक झाली होती. यानंतर भागवत आझादपूर येथील मदरशात गेले होते. इलियासी यांनी संघ प्रमुखांना 'राष्ट्रपिता' आणि 'राष्ट्र-ऋषी' संबोधले आहे. भागवत यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, 'यातून खूप चांगला संदेश जाईल. आपण वेगवेगळ्या देवांची पूजा करतो पण सर्वात मोठा धर्म मानवता आहे. आमचा विश्वास आहे की देश प्रथम आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.