Madras High court Dainik Gomantak
देश

Madras High Court: 'न्यायालयांमध्ये महात्मा गांधी आणि तमिळ संत-कवी तिरुवल्लुवर यांचेच फोटो...', मद्रास HC चा आदेश

Madras High Court: तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील न्यायालयांमध्ये महात्मा गांधी आणि तमिळ संत-कवी तिरुवल्लुवर यांचेच फोटो लावावेत, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Manish Jadhav

Madras High Court: तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील न्यायालयांमध्ये महात्मा गांधी आणि तमिळ संत-कवी तिरुवल्लुवर यांचेच फोटो लावावेत, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

जिल्हा न्यायालयांमध्येही इतर कोणाचेही फोटो लावू नयेत, असे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेल्या परिपत्रकात जिल्हा न्यायालयांना न्यायालयात याव्यतरिक्त फोटो आढळल्यास ते काढून टाकण्यास सांगितले आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाने कांचीपुरमच्या जिल्हा न्यायाधीशांना आदेश दिला की, अलंदूरच्या बार असोसिएशनला सांगा की, नव्याने बांधलेल्या कोर्ट कॉम्प्लेक्सच्या गेटवरील बीआर आंबेडकर यांचा पुतळा हटवा. अनेक वकील संघटनांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची परवानगी मागितली तेव्हा ही बाब समोर आली.

दुसरीकडे, 11 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अशा याचिका फेटाळल्या आणि फूल कोर्ट मिटींगमध्ये वेगळा ठराव मंजूर करण्यात आला.

त्यात म्हटले की, राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमा किंवा पुतळ्यांची तोडफोड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे टाळण्यासाठी न्यायालय महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि संत कवी तिरुवल्लुवर यांच्याशिवाय इतर कोणाचेही फोटो किंवा पुतळे बसवण्यास परवानगी देणार नाही.

तसेच, एप्रिल 2013 मध्ये न्यायालयाने अलंदूर न्यायालयातील आंबेडकरांचा पुतळा हटवण्याचे निर्देश दिले होते. तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुद्दुचेरी येथील बार कौन्सिलने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे रजिस्ट्रार जनरल यांनी त्यांच्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT