Siddaramaiah Vs Shivakumar Dainik Gomantak
देश

Karnataka Politics: 'मुझे मिले पहला हाफ...,' डीके शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांना सांगितला हा फॉर्म्युला

Siddaramaiah Vs Shivakumar: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बुधवारी बातमी आली की, काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांच्या नावाला मंजूरी दिली आहे.

Manish Jadhav

Karnataka Politics: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बुधवारी बातमी आली की, काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांच्या नावाला मंजूरी दिली आहे. मात्र काही तासांतच पुन्हा एकदा मोठी घडामोड पाहायला मिळाली.

काँग्रेसचे (Congress) कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, मंथन अजूनही सुरु आहे. येत्या 24 ते 48 तासांत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होणार आहे.

आता डीके शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाचे विभाजन करण्याचा नवा फॉर्म्युला दिल्याचे वृत्त आहे. '

आज तक'च्या वृत्तानुसार, डीके शिवकुमार यांनी तीन-दोन वर्षांसाठी जी काही मुदत हवी असेल, ती आधी द्यावी, असा फॉर्म्युला दिला आहे. यानंतर सिद्धरामय्या यांना संधी मिळायला हवी.

यापूर्वी, सिद्धरामय्या यांनीही असाच फॉर्म्युला दिल्याचे वृत्त आले होते. ते म्हणाले होते की, माझे वय वाढत चालले आहे, आधी मला दोन वर्षांसाठी संधी द्यावी. नंतर डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवता येईल.

यावर प्रश्न विचारला असता, डीके शिवकुमार म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाचे विभाजन व्हायला हवे. सिद्धरामय्या यांनी एकदा खुर्चीचा ताबा घेतल्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही, अशी भीती यामागे असल्याचे बोलले जात होते.

याबाबत, छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारचे उदाहरणही समोर आले, जेव्हा 2018 मध्ये त्यांच्या आणि टीएस सिंह देव यांच्यात अर्ध्या मुदतीचा निर्णय घेण्यात आला होता.

तसेच, अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा होती, मात्र भूपेश बघेल यांनी सरकारची कमान सोडण्यास नकार दिला.

शेवटी इतकं शत्रुत्व निर्माण झालं की 2022 मध्ये टीएस सिंह देव यांनी मंत्रिमंडळ सोडलं. खरे तर, डीके शिवकुमार यांनाही उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाचे मंत्रिपद देण्याची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती फेटाळून लावली.

मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असताना हीच योग्य वेळ असल्याचे त्यांना वाटते, कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून ते यशस्वी झाले आहेत. मी माझा शब्द पूर्ण केला आहे, आता हायकमांडला निर्णय घ्यायचा आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी हायकमांडकडे केला आहे.

डीके शिवकुमार निर्णय होईपर्यंत दिल्लीतच राहणार आहेत

सध्या बैठकांचे सत्र सुरु आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सकाळी पहिल्यांदा सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि नंतर डीके शिवकुमारही त्यांना भेटण्यासाठी पोहोचले.

यानंतर, डीके शिवकुमार यांनी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटेपर्यंत दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT