Diwali Gift Twitter
देश

Diwali Gift: चेन्नईतील 'या' ज्वेलरी शॉपच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच चांदी

चेन्नईतील चलनी ज्वेलर्सच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्या.

दैनिक गोमन्तक

चेन्नईतील एका दागिन्यांच्या दुकान मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी (Diwali Gift) भेट म्हणून कार आणि बाईक दिल्या आहेत. चलनी ज्वेलर्सने (Chalani Jewellery) रविवारी आपल्या 10 कर्मचाऱ्यांना कार आणि 20 कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मोटारसायकल भेट दिल्या आहेत. चलनी ज्वेलर्सचे मालक जयंती लाल म्हणाले की, या कर्मचाऱ्यांनी चढ-उताराच्या काळातही आम्हाला साथ दिली आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट आहे. 

चलनी ज्वेलरीच्या जयंती लाल चैंती यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या सहकार्‍यांना 8 कार आणि 18 बाईक दिल्या होत्या. काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तर काहींना आश्चर्याचा धक्का बसला. जयंती लाल यांनी सांगितले की, ही भेट त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. व्यवसायातील चढ-उताराच्या काळातही या कर्मचाऱ्यांनी आम्हाला साथ दिली आणि नफा मिळवण्यात मदत केली. ते केवळ कर्मचारी नाहीत तर ते आमचे कुटुंबही (Family) आहेत. असे सरप्राईज देऊन आम्हाला त्यांना आमच्या कुटुंबासारखे वागवायचे होते. 

कार्तिक महिन्याच्या 15 व्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान राम 14 वर्षांचा वनवास पुर्ण करून घरी परतले आणि वनवासात त्यांनी रावणावर विजय मिळवला. यावर्षी दिवाळी 24 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. 

सुरतचे डायमंड किंग सावजी ढोलकिया त्यांच्या दिवाळी भेटवस्तूमुळे खूप चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कार दिली. ट्विटरवर खूप सक्रिय असलेले सावजी ढोलकिया आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देणार आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. 2014 मध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 491 कार आणि 207 फ्लॅट्स दिवाळी भेट म्हणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

SCROLL FOR NEXT