DRI Dainik Gomantak
देश

डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सची मोठी कारवाई, 30 विदेशी हाय-एंड प्रीमियम घड्याळे केली जप्त; किमती जाणून...

डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने मुंबई झोनल युनिटने एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्या घरातून त्यांनी सुमारे 30 कोटी रुपयांची 30 हून अधिक विदेशी घड्याळे जप्त केली आहेत.

Puja Bonkile

डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने शनिवारी (22 जुलै)ला एक मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये मुंबई झोनल युनिटने एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्या घरातून तस्करी केलेली 30 हून अधिक प्रीमियम परदेशी घड्याळे जप्त केली.

यातील बहुतेक घड्याळे विलक्षण आणि खूप महाग आहेत. या सर्व घड्याळांच्या एकूण मार्केटमधील किंमत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

टिआरआईने निदर्शनास आणून दिले की बॅगेजद्वारे व्यक्तींनी घड्याळे आयात केल्यास बॅगेज नियमांनुसार 38.5 टक्के कस्टम ड्युटी लागू होते, जी त्या व्यक्तीने चोरली होती.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार "आमच्या गुप्तचर विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गेल्या आठवड्यात सिंगापूरहून आलेल्या व्यक्तीला कोलकाता विमानतळावर रोखण्यात आले आणि एक अतिशय महागडे ग्रुबेल फोर्सी घड्याळ जप्त करण्यात आले, जे त्याने सीमाशुल्क अधिकार्‍यांना यापूर्वी घोषित केले नव्हते.

अधिकार्‍यांनी पुढे सांगितले की या व्यक्तीला सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. परंतु डीआरआई, मुंबई झोनल युनिटच्या अधिकार्‍यांनी कोलकाता येथील एका अपमार्केट निवासी संकुलात त्याच्या घराची झडती घेतली आणि 30 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले.

डीआरआयने जप्त केलेल्या तस्करीच्या मालाची किंमत एकूण 30 कोटी रुपये आहे आणि त्यात ग्रीबेल फोर्से, पर्नेल, लुई व्हिटॉन, एमबी अँड एफ, मॅड, रोलेक्स, ऑडेमार्स पिग्युट आणि रिचर्ड मिलसह प्रीमियम परदेशी ब्रँडच्या 30 घड्याळ आढळ्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT