Makar Sankranti 2024 Dainik Gomantak
देश

Makar Sankranti: गोव्यात मकर संक्रात तर इतर राज्यात म्हणतात काय? वाचा इतिहास काय सांगतो

Makar Sankranti: मात्र लीप वर्ष असल्यानं एक दिवस जोडला गेल्यानं यावर्षी १५ जानेवारीला हा सण साजरा केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Makar Sankranti: थंडी जरा कमी होऊ लागली. जानेवारीचे पहिले १३ दिवस उलटले की लगेच येतो मकर संक्रातीचा सण. पौष महिन्यातला हा सण आपल्या शेतीप्रधान संस्कृतीतला महत्वाचा सण असून यावेळी पीकं काढणीला किंवा कापणीला येतात. त्याचा आनंद किंवा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो.

याशिवाय सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो म्हणून उत्तरायणाला सुरुवात झाली असेही म्हटले जाते. १४ जानेवारीला मकरसक्रांतीचा सण साजरा केला जातो. मात्र लीप वर्ष असल्यानं एक दिवस जोडला गेल्यानं यावर्षी १५ जानेवारीला हा सण साजरा केला जात आहे.

आता आपण महाराष्ट्रात या सणाला मकरसंक्राती म्हणतो पण विविध राज्यात याला वेगवेगळी नावं आहेत. ती नावं तुम्हाला माहीती आहेत का? पंजाबमध्ये याला लोहरी म्हणतात. तमिळनाडू मध्ये पोंगल, आसाममध्ये मेग बिहू, मेघ मेला असं सेंट्रल आणि नॉर्थ इंडियामध्ये म्हटलं जातं किंवा उत्तर प्रदेशात याला खिचडी संक्रात असेही म्हणतात. तसेच महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणा, कर्नाटक मध्येदेखील मकर संक्रात म्हणतात.तर काश्मीरमध्ये शिशूर सेनक्रांथ म्हणतात.

इतकच नाही भारताबाहेर नेपाळमध्ये माघे संक्रांती, थायलंडमध्ये सोंगक्रान, म्यानमारमध्ये थिंगयान, कंबोडियामध्ये मोहन सोंगक्रान म्हणतात.

मकर संक्रातीचा इतिहास

महाभारतात मकर संक्रातीविषयी एक आख्यायिका आहे. असे म्हटले जाते की पितामह भिष्म यांनी त्यांचे नश्वर शरीर सोडण्यासाठी मकर सक्रांतीचा दिवस निवडला होता. असे म्हटले जाते की, ज्यांचा या दिवशी मृत्यू होतो त्यांना मुक्ती मिळते.

अशा प्रकारे विविध राज्यात आणि देशात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक राज्यातमध्ये पंतग उडवले जातात त्यामुळे याला पतंग महोत्सव म्हणून देखील ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT