Marriage  Dainik Gomantak
देश

तुम्हाला Dowry Calculator बाबत माहितीये का? ऑनलाईन पेज असल्याचे कळताच नेटिझन्स...

Dowry Calculator: एकीकडे हुंडा देणे हे सामाजिक दुष्कृत्य मानले जाते, तर दुसरीकडे हुंडा न घेता होणारे विवाह क्वचितच होताना दिसतात.

Manish Jadhav

Dowry Calculator: आजच्या युगात एकीकडे हुंडा देणे हे सामाजिक दुष्कृत्य मानले जाते, तर दुसरीकडे हुंडा न घेता होणारे विवाह क्वचितच पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या जमान्यात Dowry Calculator पण आले. हे सार्वजनिक उपयोगासाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. यामध्ये हुंड्याची रक्कम किती आहे आणि तुम्ही किती हुंडा मिळवण्यासाठी पात्र आहात हे पर्सनल माहिती भरुन कोणालाही कळू शकते. हे पेज ऑनलाइन लोड होत आहे.

Dowry Calculator ऑनलाइन उपलब्ध

Dowry Calculator ऑनलाइन उपलब्ध आहे. Shaadi.com वर असेच कॅल्क्युलेटर सुमारे दशकभरापूर्वी विकसित करण्यात आले होते. Google.com सारख्या सर्च इंजिनमध्ये Dowry Calculator चे पेज देखील आहे.

तुम्ही यापूर्वी कधी Dowry Calculator पेजबाबत सर्च केले आहे का? जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल आणि ऑनलाइन जोडीदार शोधत असाल तर मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मचे हे पेज तुम्हाला मदत करु शकते. याद्वारे तुम्ही तुमच्या प्रोफाइलनुसार किती हुंड्यासाठी पात्र आहात याची माहिती मिळते. सुरुवातीला, Dowry Calculator एक साधा प्रश्न विचारते की, "तुम्ही किती हुंडा घेण्यास पात्र आहात?" यानंतर साइट तुम्हाला वय, व्यवसाय, उत्पन्न इत्यादी तपशील विचारते.

नेटिझन्सची प्रतिक्रिया

एक जण म्हणाला की, "सुरुवातीला Dowry Calculator पाहून धक्काच बसला... आश्चर्यचकित झालो. हुंड्याची किंमत दाखवण्याऐवजी, 'कॅल्क्युलेटर' ने देशातील हुंड्यामुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दलची आकडेवारी दाखवली.

ही वेबसाइट कोणी तयार केली?

ही वेबसाइट तनुल ठाकूर यांनी 8 वर्षांपूर्वी तयार केली होती. तनुल पत्रकार आहेत. त्यांच्या मते, ही साइट हुंड्याच्या प्रथेवर एक व्यंग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT