Tirupati Balaji Temple Dainik Gomantak
देश

तिरुपती मंदीरात भक्ताकडून 5 किलोची सोन्याची तलवार दान; किंमत करोडोत

भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात (Tirupati Balaji Temple) एक कोटी रुपये किंमतीच्या सोन्याच्या तलवार 'सूर्य कटारी' अर्पण केली आहे.

दैनिक गोमन्तक

तिरुपती मंदिर (Tirupati Mandir) हे देशातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथे भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांना कोट्यावधी रुपयांच्या देणग्या दिल्या जातात. त्यातच हैदराबादमधील एका व्यावसायिकाने सोमवारी भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात एक कोटी रुपये किंमतीच्या सोन्याच्या तलवार 'सूर्य कटारी' अर्पण केली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "हैदराबादमधील व्यावसायिक एम. एस. प्रसाद यांनी तिरुमला येथील व्यंकटेश्वर स्वामींना सूर्य कटारी (तलवार) अर्पण केली." देवस्थानच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तलवारीचे वजन पाच किलो असुन ती दोन किलो सोनं आणि तीन किलो चांदीपासून बनवण्यात आलेली आहे. (Devotees donate 5 kg gold sword at Tirupati temple)

श्री व्यंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये असलेल्या तिरुमाला टेकड्यांवर बांधले गेले आहे. हे एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर अनेक शतकांपूर्वी बांधले गेले होते जे वास्तुकलेचे आणि कुशल कारागिरीचा एक उत्तम नमुणा आहे. होयसला आणि विजयनगरच्या राजांनी मंदिराच्या बांधणीत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असेही सांगितले जाते.

जम्मूमध्ये देखील भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. केवळ . हे मंदिर सिदडा मधील मजीण येथे असणार आहे. मंदिराचे भूमिपूजन मागील महिन्यात झाले असून ते अवघ्या 18 महिन्यांत तयार होणार आहे.

भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराच्या बांधकामासाठी माजिन गावात 25 हेक्टर (सुमारे 62 एकर) जमीन देण्यात आली आहे. ही जमीन 40 वर्षांपासून भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. तिरुमला या जागेवर तिरुपती देवस्थान मंदिर, वेद पाठशाला, आध्यात्मिक केंद्र, निवासी सुविधा आणि पार्किंग तयार करणार आहे. त्याचबरोबर येत्या काही काळात येथे आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT