Vijay Rupani Dainik Gomantak
देश

Gujarat Election: पूर्व CM सह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

Gujarat Election: त्याचवेळी नितीन पटेल यांनी सीआर पाटील यांना पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी नितीन पटेल यांनी सीआर पाटील यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्येही त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) म्हणाले की, 'मी पाच वर्षे सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्री म्हणून काम केले. या निवडणुकांमध्ये नवीन कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. मी निवडणूक लढवणार नाही, असे मी दिल्लीतील (Delhi) वरिष्ठांना पत्र पाठवून कळवले आहे. निवडलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही काम करु.' यावेळी नितीनभाई पटेल म्हणाले की, 'विजय रुपाणी आणि मी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निवडणूक लढवत नाही.'

तसेच, या दोघांशिवाय आणखी काही नावे पुढे आली आहेत, ज्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आहे. विजय रुपाणी सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षण आणि महसूल मंत्री असलेले भूपेंद्र सिंह चुडासामा यांच्याप्रमाणे निवडणूक लढवणार नाहीत. विजय रुपाणी, नितीन पटेल आणि भूपेंद्र चुडासामा विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार नाहीत. यासोबतच विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सौरभ पटेल आणि प्रदीपसिंह जडेजा यांचीही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे.

निवडणूक लढवणार नाहीत

  • माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

  • नितीन पटेल

  • प्रदीपसिंह जडेजा

  • सौरभ पटेल

  • विभावरी बेन

  • कौशिक पटेल

  • वल्लभ काकडिया

  • योगेश पटेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT