Energy Minister Satyendra Jain Dainik Gomantak
देश

"एक दिवसाचाही कोळसा नाही...": ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन

देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा (Coal Crisis) असल्याने वीज कपात केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा (Coal Crisis) असल्याने वीज कपात केली जात आहे. याबाबत दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra jain) म्हणाले की, ''संपूर्ण देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे, बॅकअप नाही, त्यामुळे वीज साठवता येत नाही. आज फक्त 1 दिवसाचा कोळसा शिल्लक राहीला आहे, जे की 21 दिवस पुरेल एवढा साठा आवश्यक आहे. दिल्लीत आमचे कोणतेही पेमेंट बाकी नाही. केंद्र सरकारने कोळसा रॅक्स वाढवावे. समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे हे निश्चित करावे लागेल.''

ते म्हणाले की, ''संपूर्ण देशात कोळशाचा प्रचंड तुटवडा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेल्वे रॅक्सचे आहे. त्यांची उपलब्धता कमी आहे.''

ते पुढे म्हणाले की, ''आमच्याकडे कोणताही बॅकअप नाही, वीज साठवता येत नाही. जर कोळशापासून वीज निर्माण केली जात असेल तर कोळशाचा बॅकअप असावा, जो सामान्य स्थितीत 21 दिवसांपेक्षा जास्त असणे आपेक्षित आहे. आज, बहुतेक प्लांटमध्ये 1 दिवसापेक्षा कमी कोळसा शिल्लक आहे. एनटीपीसी दादरी आणि एनटीपीसी उंचाहारमध्ये सुमारे 1 दिवसाचा कोळसा (Coal) शिल्लक आहे.'' दिल्लीचे ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे कोणतेही पेमेंट बाकी नसल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT