Crime Dainik Gomantak
देश

Delhi-NCR: दिल्लीत पुन्हा निर्भयाकांड! 5 नराधमांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार

Delhi-NCR Crime: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणासारखी घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi-NCR Crime: दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणासारखी घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून दिल्लीतील एका महिलेचे अपहरण करुन गाझियाबादमध्ये दोन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपीने अमानुषतेची हद्द ओलांडत पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही घातला. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी, 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. पाच आरोपींनी तिला दोन दिवस आपल्या वासनेची शिकार बनवले. आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही घातला. यानंतर पीडितेला त्याच जखमी अवस्थेत आश्रम रोडजवळ फेकून हे नराधम फरार झाले. याबाबतची माहिती यूपी-112 वरुन पोलिसांना (Police) या घटनेची मिळताच पीडितेला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. पीडितेवर दिल्लीच्या (Delhi) जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे, एसपी सिटीने सांगितले की, 'ही महिला दिल्लीतील नंदनगरीची रहिवासी आहे. ती नंदग्राम परिसरात भावाच्या घरी आली होती. घरी परतत असताना आरोपींना तिला उचलले.' चौकशीत आरोपींची या महिलेशी पूर्वीपासून ओळख असून मालमत्तेवरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु असल्याचे समोर आले. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचवेळी, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी गाझियाबाद पोलिसांना नोटीस बजावली आहे.

तसेच, गाझियाबादचे एसपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, '18 ऑक्टोबरला नंदग्राम पोलिसांना आश्रम रोडवर महिला सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. ती दिल्लीची रहिवासी असून भावासोबत नंदग्रामला आली होती. तिचा भाऊ तिला सोडायला आला होता. यानंतर तिचे अपहरण करुन हा गुन्हा करण्यात आला. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर, 4 जणांना अटकही करण्यात आली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

SCROLL FOR NEXT