Varun Gandhi: रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ शेअर करत वरुण गांधी म्हणाले...

Varun Gandhi Tweet: भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला गोत्यात आणले आहे.
Varun Gandhi
Varun GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Varun Gandhi Tweet Unnao Video: भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला गोत्यात आणले आहे. वरुण गांधींनी रडणाऱ्या चिमुरडीचा व्हिडिओ शेअर करुन सरकारी अधिकारी आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना नैतिकतेचे धडे दिले आहेत. यासोबतच त्यांनी सत्तेत असणाऱ्या योगी सरकारवरही निशाणा साधला. यूपीच्या उन्नावमधील या व्हिडिओमध्ये फी न भरल्यामुळे एका मुलीला परीक्षेला बसू दिले नाही. यासाठी सरकारला नैतिकदृष्ट्या जबाबदार धरत रडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ वरुण गांधी यांनी शेअर केला.

वरुण गांधी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला

व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी लिहिले की, 'या मुलीचे अश्रू लाखो मुलांच्या वेदना दर्शवतात, ज्यांना फी न भरल्यामुळे अपमान सहन करावा लागतो. मुलांच्या शिक्षणात आर्थिक चणचण निर्माण होणार नाही याची काळजी घेणे ही प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे.' त्यांनी आपल्या पक्षाच्या सरकारकडेही (Government) उत्तर मागितले आहे. खासगी संस्थांवर निशाणा साधत ते म्हणाले की, 'माणुसकी विसरता कामा नये. शिक्षण हा व्यवसाय नाही.'

Varun Gandhi
GST: वरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर

उन्नावचे बांगरमाऊ प्रकरण

हा व्हिडिओ उन्नावमधील बांगरमाऊजवळील टोला नावाच्या गावातील आहे, जिथे शाळेच्या गेटबाहेर उभे राहून मुली रडताना दिसत आहेत. या मुलींची परीक्षा चुकली होती. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अपूर्व सिंग या विद्यार्थीनीने (Students) सांगितले की, 'मी (शाळा व्यवस्थापनाला) सांगितले होते की, वडील आज फी घेऊन येतील, पण त्यांनी आम्हाला हाकलून दिले.'

Varun Gandhi
Shashi Tharoor: कॉंग्रेस नेते शशी थरुर 'हे' डिवाइस गळ्यात का घालतात, जाणून घ्या खासियत

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

एका स्थानिक भाजप नेत्याने नंतर बाल विद्या मंदिर शाळेतील मुलांची ऑक्टोबर ते मार्च (रु. 3,000) थकबाकी मंजूर केली. सार्वजनिक दबावानंतर, शाळा व्यवस्थापन समितीने सांगितले की, 'फी भरण्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन या विद्यार्थ्यांना मंगळवारी चुकलेली परीक्षा देण्याची संधी मिळेल.' उर्वरित विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत आणि त्यांची किती थकबाकी आहे हे लगेच कळू शकले नाही. सप्टेंबरपासून किमान 10 विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क भरलेले नाही. ते शाळेबाहेर उभे राहून रडत होते. स्थानिक प्रशासनाने तपास सुरु केल्याचे एका अहवालात म्हटले आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांची चुकलेली परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याचे शाळेच्या व्यवस्थापकाने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com