Delhi Riots Dainik Gomantak
देश

Delhi Riots 2020: दिल्ली दंगलीप्रकरणी 'आप' नेत्याचा पर्दाफाश, हिंदूंना...

Delhi Riots 2020: दिल्ली दंगलीप्रकरणी कर्करडूमा न्यायालयाने आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन आणि इतर 10 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Delhi Riots 2020: दिल्ली दंगलीप्रकरणी कर्करडूमा न्यायालयाने आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन आणि इतर 10 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. न्यायालयाने ताहिर हुसैन, रियासत अली, गुलफाम, शाह आलम, रशीद सैफी, अर्शद कय्युम, लियाकत अली, मोहम्मद शादाब, मोहम्मद आबिद आणि इर्शाद अहमद यांच्याविरुद्ध कलम 147, 148 153ए, 323 आणि 395 अंतर्गत आरोप निश्चित केले.

हिंदूंना लक्ष्य करुन हिंसाचार'

न्यायालयाने (Court) आपल्या आदेशात म्हटले की, 'सर्व आरोपी हिंदूंना जास्तीत जास्त हानी पोहोचवण्याच्या आणि मारण्याच्या उद्देशाने काम करत होते. ताहीर हुसेन (Tahir Hussain) यांच्या घरी जमलेल्या जमावाचा उद्देश हिंदूंना धडा शिकविणे हा होता. ताहीर हुसेन यांच्या घराचा दंगलीसाठी आणि दंगलखोरांच्या कारवायांसाठी ज्याप्रकारे वापर करण्यात आला, त्यावरुन ते एका सुनियोजित कटाखाली हिंदूंचे (Hindu) नुकसान करण्याच्या उद्देशाने काम करत असल्याचे दिसून येते.'

तक्रारदाराचे वक्तव्य

वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण अजय गोस्वामी यांनी खजुरी खास पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानंतर नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. गोस्वामी यांनी सांगितले की, 'करावल नगर रोडवर जमावाकडून गोळी झाडण्यात आली. तिथे जमावाने लोकांवर दगडफेक आणि गोळ्या झाडल्या.' गोस्वामी पुढे म्हणाले की, 'गोळी लागल्याने मी तिथे पडलो, त्यानंतर माझ्या काकांनी काही मुलांच्या मदतीने मला रुग्णालयात दाखल केले.'

'जमाव हिंदूंना मारण्याचा बेत होता'

जमाव दगडफेक, अ‍ॅसिड आणि पेट्रोल बॉम्ब फेकत होता, गोळीबार करत होता, हिंदू आणि त्यांच्या घरांना लक्ष्य करत होता, हे साक्षीदारांच्या जबाबावरुन स्पष्ट होते, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. साहजिकच, जमावाचा हेतू हिंदूंचे जास्तीत जास्त जीवित आणि मालमत्तेचे नुकसान करण्याचा होता. तर गोळीबारावरुन हे स्पष्ट होते की, जमावाचा हिंदूंचा जीव घेण्याचा बेत होता. साहजिकच या प्रकरणात ज्या लोकांना आरोपी बनवले गेले ते जमावाच्या हेतूकडे दुर्लक्ष करत नव्हते.

'ताहिर हुसेन यांच्या घरी जमली गर्दी'

न्यायालयाने आपल्या आदेशात पुढे म्हटले आहे की, 'ताहिर हुसैन यांच्या घरी जमलेल्या जमावातील काही लोक बंदुका, अ‍ॅसिड आणि पेट्रोल बॉम्बने सज्ज होते. जमावात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा उद्देश हिंदूंना मारणे आणि त्यांचे जास्तीत जास्त नुकसान करणे हे होता. त्यामुळे सर्व आरोपींविरुद्ध गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

SCROLL FOR NEXT