Delhi Riot: मोठा दिलासा ! उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

Umar Khalid: राष्ट्रीय राजधानीत 2020 मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने उमर खालिद आणि खालिद सैफी यांना आरोप मुक्त केले आहे.
Umar Khalid
Umar KhalidTwitter / @ANI
Published on
Updated on

Umar Khalid: राष्ट्रीय राजधानीत 2020 मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने उमर खालिद आणि खालिद सैफी यांना आरोप मुक्त केले आहे. उमर खालिद आणि खालिद सैफी यांच्यावर दंगलीदरम्यान पार्किंग लॉटला आग लावण्याचा आरोप होता. ईशान्य दिल्लीतील दंगलीशी संबंधित एका खटल्याची सुनावणी न्यायासयात सुरु होती. CAA आणि NRC विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत दंगल उसळली होती. या दंगलींमध्ये अनेकांचे बळी गेले होते. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले होते.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी उमर खालिदच्या जामिनाला विरोध केल्यावर कर्करडूमा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. खालिदच्या सुटकेमुळे समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी उमरच्या अंतरिम जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. दुसरीकडे, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

Umar Khalid
नुपूर शर्मांना दिल्ली पोलिसांनी दिली सुरक्षा, जीवे मारण्याची मिळाली धमकी

दिल्ली पोलिसांचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) एलएम नेगी यांनी दाखल केलेल्या उत्तरात पोलिसांनी म्हटले होते की, 'खालिदची आई बुटीक चालवते. त्याचे वडीलही 'वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया' या राजकीय पक्षाचे नेतृत्व करत आहेत. दोघेही लग्नाची व्यवस्था पाहण्यास सक्षम आहेत. अशा परिस्थितीत उमर खालिदच्या जामिनाची गरज नाही. उमर खालिदची सुटका न्याय्य नाही, कारण तो या कालावधीत सोशल मीडियाचा वापर करुन चुकीच्या माहितीचा प्रसारही करु शकतो.'

Umar Khalid
कुरुक्षेत्रात 'महाभारत', तजिंदर बग्गाला हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या दिले ताब्यात

तसेच, समाजात अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे. एवढेच नाही तर उमर खालिद साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो. उमरने अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्यासमोर आपल्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com