Delhi Crime Dainik Gomantak
देश

Delhi Crime: ज्या सहकाऱ्यांसोबत पार्टी केली, तेच बनले सैतान! दिल्लीतील कॅफेत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक अन् तिघांचा शोध सुरु

Delhi Crime News: दिल्लीतील प्रीत विहार भागात असलेल्या सल्तनत कॅफेमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Delhi Crime News: दिल्लीतील प्रीत विहार भागात असलेल्या सल्तनत कॅफेमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ज्या सहकाऱ्यांसोबत ती पार्टीसाठी गेली होती, त्यांच्यावरच तिने गंभीर आरोप केले. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिच्यासोबत काम करणाऱ्या दोन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना साथ दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली असून, उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

पीडित तरुणी कडकडडूमा येथील क्रॉस रिवर मॉलमधील एका कॅफेमध्ये काम करते आणि आरोपीही (Accused) तिचे जुने ओळखीचे सहकारी आहेत. सोमवारी रात्री ती आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत प्रीत विहारच्या सल्तनत कॅफेमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती. या गटामध्ये काही महिलांचाही समावेश होता. रात्री सुमारे साडेअकरा वाजता कॅफे बंद करण्याची वेळ झाली होती, मात्र गटातील एका व्यक्तीकडे कॅफेची चावी असल्याने त्यांनी पुन्हा कॅफे उघडला आणि आत पार्टी सुरु केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकरा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चाललेल्या या पार्टीत सर्वांनी मद्यपान केले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास सर्वजण बाहेर पडले. याच दरम्यान दोन तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप 22 वर्षीय तरुणीने केला असून, इतर सहकाऱ्यांनीही त्यांना मदत केल्याचे तिने म्हटले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन तपासाला वेग दिला. आतापर्यंत दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून, पसार झालेल्या तीन आरोपींचा शोध सुरु आहे. ओळखीच्या सहकाऱ्यांकडूनच असा प्रकार घडल्याने या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस सर्व उपस्थितांची भूमिका तपासत असून, पुढील चौकशीनंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

School Without Walls: मोबाईलच्या दुनियेत हरवली बिनभिंतीची शाळा; निसर्गाकडून शिकण्याची संधीच कमी झाली!

25 नोव्हेंबर 1510... तो दिवस, जेव्हा 'जुने गोवे' पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले!

Vaibhav Sooryavanshi: 30 मिनिटांची चर्चा अन् रेकॉर्डब्रेक खेळी! वैभव सूर्यवंशीने युवराज सिंगला दिले द्विशतकाचे श्रेय; म्हणाला, 'युवी सरांशी बोलल्यानंतर...'

Drug Trafficking: दक्षिण गोव्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक! 11 दिवसांत 6 गुन्हे, 9 जणांना अटक

SCROLL FOR NEXT