Delhi High Court Dainik Gomantak
देश

Delhi High Court: ''महिलाही लैंगिक शोषण करु शकते'', POCSO प्रकरणात हायकोर्टाने असे का म्हटले? वाचा संपूर्ण प्रकरण

POCSO Case: प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला.

Manish Jadhav

प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, या कायद्यांतर्गत एखाद्या महिलेवर पेनिट्रेटिव्हद्वारे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठाने सांगितले की, POCSO कायद्याचे कलम 3 पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे, ज्यामध्ये कोणतीही वस्तू किंवा शरीराच्या भागाचा प्रवेश किंवा प्रवेश करण्याच्या हेतूने मुलाच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे समाविष्ट आहे. त्यामुळे, या तरतुदींनुसार केवळ पेनिसच्या माध्यमातून पेनेट्रेशन करणे हा गुन्हा मानला जातो असे म्हणणे पूर्णपणे अतार्किक ठरेल.

दरम्यान, न्यायमूर्तींनी आपल्या 15 पानी आदेशात नमूद केले की, 'लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी 'पॉक्सो कायदा' तयार करण्यात आला. बालकाविरुद्ध गुन्हा एखादा पुरुष किंवा स्त्रीही करु शकते.' खंडपीठाने आपल्या आदेशात पुढे म्हटले की, 'कलम 3(A), 3(B), 3(C) आणि 3(D) मध्ये वापरण्यात आलेल्या 'तो' या सर्वनामाचा अशा प्रकारे अर्थ लावला जाऊ नये की, त्या कलमांमध्ये समाविष्ट केलेले गुन्हे केवळ पुरुषापर्यंत मर्यादित आहेत. हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे की, या तरतुदींमध्ये लैंगिक अत्याचाराच्या कक्षेत कोणतीही वस्तू किंवा शरीराच्या भागाचा प्रवेश किंवा पेनेट्रेशनसाठी मुलाच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे किंवा तोंडाचा वापर करणे देखील समाविष्ट आहे.'

एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला. शहर न्यायालयाच्या मार्च 2024 च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार करताना न्यायालयाने POCSO कायद्याची व्याप्ती वाढवली. न्यायालयाने महिलेवर लैंगिक छळाचे आरोप निश्चित केले होते. ही बाब 2018 ची आहे. अधिवक्ता पियुष सचदेव यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत महिलेने असा युक्तिवाद केला होता की, स्त्रीवर पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार आणि गंभीर पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाहीत. कारण कायद्याच्या व्याख्येतून वारंवार सूचित होते की, 'तो' या सर्वनामाचा प्रयोग करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

Betting websites, apps Blocked: ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यावर सरकारचा मोठा 'प्रहार'; 300 हून अधिक बेकायदेशीर वेबसाइट्स आणि ॲप्स ब्लॉक!

SCROLL FOR NEXT