Delhi High Court: 'तुम्ही ठीक आहात ना?' PM मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधातील याचिकेवर हायकोर्टाने फटकारले; वाचा नेमकं प्रकरण

Delhi High Court: पंतप्रधान मोदींना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.
Delhi High Court: 'तुम्ही ठीक आहात ना?' PM मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधातील याचिकेवर हायकोर्टाने फटकारले; वाचा नेमकं प्रकरण
Delhi High CourtDainik Gomantak

पंतप्रधान मोदींना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. याचिका फेटाळताना तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी आहात, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्याला म्हटले. प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी स्थानिक एसएचओला याचिकाकर्ते दीपक कुमार यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. न्यायालयाने पुढे म्हटले की, गरज भासल्यास मेंटल हेल्थकेअर कायद्यातील अधिकारांचा वापर करावा.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय राज्यघटनेशी निष्ठेची खोटी शपथ घेतल्याचा आरोप कुमार यांनी केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) माजी सरन्यायाधीशांच्या हत्येचा प्रयत्न करत आहेत, असे कुमार आपल्या याचिकेत म्हणाले. त्यावर न्यायालयाने कुमार यांनी विचारले की तुम्ही योग्या आहात का?

Delhi High Court: 'तुम्ही ठीक आहात ना?' PM मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधातील याचिकेवर हायकोर्टाने फटकारले; वाचा नेमकं प्रकरण
Delhi High Court: ''तुम्ही तीन वर्षे झोपला होता का?'' हायकोर्टाने काँग्रेसला फटकारले; आयकर प्रकरणात मोठा झटका

न्यायालयाने पुढे म्हटले की, 'तुम्ही ठीक आहात ना?' तुमची याचिका निरर्थक आहे. कॅप्टन दीपक कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेत आरोप करण्यात आला होता की, मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2018 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात घडवून आणण्याचा कट रचून राष्ट्रीय सुरक्षा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये ते पायलट होते.

Delhi High Court: 'तुम्ही ठीक आहात ना?' PM मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधातील याचिकेवर हायकोर्टाने फटकारले; वाचा नेमकं प्रकरण
Delhi High Court: 182 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या बिल्डरचा पॅरोल वाढवण्यास HC चा नकार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कुमार यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले असून त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात यावी, असा आरोप केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com