Delhi High Court Dainik Gomantak
देश

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराशी संबंधित एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

Manish Jadhav

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराशी संबंधित एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. जर दोन प्रौढ व्यक्ती सहमतीने लैंगिक संबंध ठेवत असतील तर त्यांना चुकीच्या कृत्यासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. यादरम्यान न्यायालयाने असेही म्हटले की, लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खोट्या केसेसमुळे आरोपीची प्रतिमा मलिन होते.

दरम्यान, न्यायमूर्ती अमित महाजन या खटल्याची सुनावणी करत होते. लाइव्ह लॉच्या अहवालानुसार, ते म्हणाले की, '’समाजाचे नियम असे सांगतात की आदर्शपणे लैंगिक संबंध हे लग्नाच्या चौकटीतच घडले पाहिजेत. जर दोन प्रौढ व्यक्ती संमतीने लैंगिक संबंध ठेवत असतील तर एखाद्याला चुकीच्या कृत्यासाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. मग त्यांच्या वैवाहिक स्थितीची पर्वा न करता.’’

लैंगिक गुन्ह्यांची खोटी प्रकरणे आरोपींची प्रतिमा मलिन करतात आणि खऱ्या खटल्यांची विश्वासार्हताही नष्ट करतात, असेही न्यायालयाने पुढे म्हटले. बलात्कार प्रकरणात न्यायालयाने तरुणाला जामीन मंजूर केला. रिपोर्टनुसार, महिलेने (Women) आरोप केला होता की, त्या व्यक्तीने तिच्यासोबत अनेकवेळा जबरदस्ती सेक्स केला आणि तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.

दुसरीकडे, आरोपी (Accused) विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे नंतर कळले, असा आरोपही महिलेने केला होता. महिलेचा दावा होता की, आरोपी व्यक्ती तिच्याकडे गिफ्ट मागायचा आणि कथितपणे तिने त्याला दीड लाख रुपयेही दिले. दरम्यान, कथित घटनेच्या वेळी ही महिला प्रौढ होती, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. तसेच जामीन देताना लग्नाच्या आश्वासनावर तिची संमती प्रभावित झाली होती, हे सिद्ध करता आले नाही, असेही सांगितले. न्यायालयाने हा तपासाचा विषय असल्याचे मानले आहे.

रिपोर्टनुसार, न्यायालयाने म्हटले की, 'वरकरणी पाहता पीडिता तक्रार दाखल करण्यापूर्वी काही काळ संबंधित व्यक्तीला भेटत होती आणि विवाहित असल्याचे माहीत असतानाही तिला संबंध सुरु ठेवायचे होते.’ न्यायालयाने पुढे म्हटले की, '...जामीनावर विचार करताना कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे न्यायालयाला शक्यही नाही आणि योग्यही नाही.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

SCROLL FOR NEXT