Crime News Dainik Gomantak
देश

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Delhi Crime News: जगात आई आणि मुलाचे नाते सर्वात पवित्र मानले जाते, पण देशाची राजधानी दिल्लीतून एक अशी लाजिरवाणी घटना समोर आली.

Manish Jadhav

Delhi Crime News: जगात आई आणि मुलाचे नाते सर्वात पवित्र मानले जाते, पण देशाची राजधानी दिल्लीतून एक अशी लाजिरवाणी घटना समोर आली, ज्यामुळे या पवित्र नात्यालाच काळिमा फासला गेला. मध्य दिल्लीतील हौजी काझी परिसरात एका 39 वर्षीय मुलाला त्याच्या 65 वर्षीय आईवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आरोपीने आपल्या आईसोबत दोनदा हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे.

‘अफेअरचा’ राग, मुलाने केला हल्ला

पीडित आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मुलाने अनेक वर्षांपूर्वी तिच्या झालेल्या एका कथित प्रेमसंबंधाबद्दल शिक्षा म्हणून हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शुक्रवार (15 ऑगस्ट) पीडित महिला तिच्या 25 वर्षीय मुलीसोबत हौजी काझी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने या घृणास्पद कृत्याची तक्रार दाखल केली.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, याच महिन्याच्या सुरुवातीला ती एका धार्मिक यात्रेवरुन घरी परतली होती, तेव्हा तिच्या मुलाने तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केले. तक्रारीनुसार, पीडित महिला (Women) आपल्या निवृत्त सरकारी कर्मचारी पती, आरोपी मुलगा आणि एक मुलगी यांच्यासोबत हौजी काझी परिसरात राहते. तिची एक मोठी मुलगीही आहे, जिचे लग्न झाले असून ती त्याच परिसरात आपल्या सासरच्या लोकांसोबत राहते.

हल्ल्यानंतर घरातून पळ काढला

17 जुलै रोजी महिला, तिचा पती आणि लहान मुलगी हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते. आठ दिवसांनंतर, जेव्हा ते परदेशात होते, तेव्हा आरोपी मुलाने आपल्या वडिलांना फोन करुन त्यांना लगेच दिल्लीला परत येण्यास सांगितले. त्याने वडिलांना सांगितले की, 'तुम्ही दिल्लीला या, कारण मला तुमच्याकडून आईला घटस्फोट (Divorce) देण्याची मागणी करायची आहे'. यानंतर संपूर्ण कुटुंब 1 ऑगस्ट रोजी दिल्लीला परत आले. कुटुंब परत येताच आरोपीने कथितरित्या आपल्या आईवर शारीरिक हल्ला केला. मुलाच्या या हिंसक वागण्याला घाबरुन महिला तात्काळ घर सोडून आपल्या मोठ्या मुलीच्या घरी राहण्यासाठी गेली. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी परिस्थिती आणखी बिघडल्याने ती पुन्हा घरी परतली.

दोनदा केला बलात्कार

पीडितेने आरोप केला की, 11 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता आरोपीने कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितले की त्याला आईशी एकट्यात बोलायचे आहे. यानंतर त्याने तिला एका खोलीत बंद केले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्या वेळी तो तिला म्हणाला की 'माझ्या भूतकाळातील कृत्याची शिक्षा मी तुला देत आहे'. या घटनेमुळे महिला प्रचंड धक्का आणि भीतीच्या अवस्थेत होती. तिने तात्काळ पोलिसांत तक्रार केली नाही आणि सुरक्षिततेसाठी ती आपल्या मुलीच्या खोलीत झोपू लागली.

गुरुवारी (14 ऑगस्ट) पहाटे 3.30 वाजता आरोपी पुन्हा त्या खोलीत घुसला आणि त्याने पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी, तिने आपली मुलगी आणि मुलीच्या नवऱ्याला हा सर्व प्रकार सांगितला. तिच्या पतीने तिला पोलिसांकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर, महिलेने हौजी काझी पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. महिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 64 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT