delhi government announced e cycle-buyers will get subsidy up to rs 7500 know details  Dainik Gomantak
देश

दिल्ली सरकारची नवीन घोषणा, ई-सायकल खरेदी करणाऱ्यांना मिळणार सबसिडी

प्रदूषण कमी करण्यासाठी 59.44 कोटींची तरतूद

दैनिक गोमन्तक

दिल्ली सरकारने ई-सायकल खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी घोषणा केली की दिल्ली सरकार शहरातील पहिल्या 10,000 ई-सायकल खरेदीदारांना 5,500 रुपये सबसिडी देत ​​आहे. पहिल्या 1,000 ई-सायकल खरेदीदारांना 2,000 रुपयांची अतिरिक्त सबसिडी देखील दिली जाईल, असेही ते म्हणाले. म्हणजेच, यानुसार, पहिल्या 1000 खरेदीदारांना ई-सायकलवर 7,500 रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाईल.

याशिवाय, दिल्ली सरकारने हेवी ड्युटी कार्गो ई-सायकल आणि व्यावसायिक वापरासाठी ई-कार्टच्या खरेदीवर सबसिडीची (Subsidy) घोषणा केली आहे. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, कार्गो ई-सायकलवरील अनुदान पहिल्या 5,000 खरेदीदारांसाठी 15,000 रुपये असेल, जे पूर्वी ई-कार्टच्या वैयक्तिक खरेदीदारांना दिले जात होते. मात्र आता ही वाहने खरेदी करणाऱ्या कंपनी किंवा कॉर्पोरेट हाऊसलाही ई-सायकल खरेदीवर अनुदान मिळू शकणार आहे. गेहलोत यांनी जाहीर केले की ई-कार्ट वापरकर्त्यांना 30,000 रुपये सबसिडी मिळेल.

ते पुढे म्हणाले की, ई-सायकलवर सबसिडी देणारे दिल्ली हे पहिले राज्य ठरले आहे. या योजनेंतर्गत केवळ दिल्लीतील रहिवासीच अनुदानाचा लाभ घेऊ शकतील, असेही ते म्हणाले. पुढे, मंत्री म्हणाले की दिल्ली सरकारने (delhi-government) ऑगस्ट 2020 मध्ये धोरण सुरू झाल्यापासून ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी एकूण 59.44 कोटी रुपये अनुदान दिले आहे.

ई-सायकल खरेदी करणाऱ्यांचे अभिनंदन करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात आज आपण आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. ई-सायकलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT