राहुल गांधींचा गौप्यस्फोट, मायावतींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण...

सीबीआय आणि ईडीची भीती वाटते
mayawati is so afraid of cbi and ed that she did not reply to my message to make her cm post in up election claims rahul gandhi
mayawati is so afraid of cbi and ed that she did not reply to my message to make her cm post in up election claims rahul gandhiDainik Gomantak
Published on
Updated on

बहुजन समाजवादी पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या दबावामुळे आणि भीतीमुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली नाही, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केला. त्यांनी मायावतींना मुख्यमंत्री बनवण्यास तयार असल्याचेही सांगितले, त्यांना संदेश पाठवला, पण बसपा प्रमुख सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय एजन्सीला इतके घाबरले की त्यांनी संदेशाला उत्तरही दिले नाही. दिल्लीतील जवाहर भवन येथे 'दलित ट्रूथ' या पुस्तकाचे प्रकाशन करताना अस मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

आज देशातील सर्व संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केला. मायावतींचे उदाहरण देताना ते म्हणाले, 'आम्ही मायावतींना युती करा, मुख्यमंत्री (CM) व्हा, असा संदेश दिला, त्या बोलल्याही नाहीत. सीबीआय आणि ईडीची भीती वाटते. कांशीराम यांनी दलितांना आवाज दिला, दलितांना जागृत केले पण आज मायावती म्हणतात की दलितांच्या आवाजासाठी लढणार नाही.

mayawati is so afraid of cbi and ed that she did not reply to my message to make her cm post in up election claims rahul gandhi
झारखंडमध्येही काँग्रेसवर संकट, आमदार मंत्र्यांवर नाराज

आज आपल्या रक्त आणि घामाने स्थापन झालेल्या पक्षाच्या मायावती म्हणतात की मी निवडणूक का लढणार नाही... कारण यावेळी ईडी, सीबीआय आणि पेगासस हे सर्वांचा तपास सुरू आहे.

आपल्या संस्था कमकुवत झाल्या तर देशही कमकुवत होईल, येथे त्यांनी पुन्हा एकदा आरएसएस आणि भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. तसेच देशाच्या कमकुवत होत असलेल्या घटनात्मक संस्थांना बळकटी देण्याचे काम काॅंग्रेस (Congress) करत आहे अस मत देखील यावेळी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com