Arvind Kejriwal Arrested  Dainik Gomantak
देश

Delhi Excise Policy: केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाकडून सीबीआयचा अर्ज मंजूर

Arvind Kejriwal Arrested: मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या मागणीवरुन दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Manish Jadhav

मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या मागणीवरुन दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सीबीआयने केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. केजरीवाल यांना 12 जुलै रोजी दुपारी 2 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या तीन दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर सीबीआयने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले होते. विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी प्रथम केजरीवाल यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आणि नंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

केजरीवालांना मद्य धोरणातील अनियमिततेप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. 21 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. अलीकडेच केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केलेल्या अटकेवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, केंद्रातील हुकूमशाही सरकारने वेगवेगळ्या खोट्या खटल्यांद्वारे केजरीवाल यांना तुरुंगात डांबले आहे. ईडी कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. PMLA मध्ये जामीन म्हणजे न्यायालयाकडून व्यक्तीला प्रथमदर्शनी निर्दोष मानने होते. केजरीवालांना सीबीआयने सर्वोच्च न्यायालयातील जामीन प्रक्रियेपूर्वी अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT