Delhi Anand Vihar Air Quality Index At 999 in Hazardous Phase Dainik Gomantak
देश

देशात दिल्लीची हवा सर्वात खराब, AQI पॅरामीटर बिघडला; दोन वर्षांचा विक्रम मोडला

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) इंडियानुसार, आनंद विहारमधील हवेचा निर्देशांक (AQI) गुरुवारी दुपारी 2 वाजता 999 वर पोहोचला.

Manish Jadhav

Delhi Anand Vihar Air Quality Index At 999 in Hazardous Phase: दिल्ली गुदमरतेय. दूषित हवेचा लहान मुले आणि वृद्धांना सर्वाधिक फटका बसत आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) इंडियानुसार, आनंद विहारमधील हवेचा निर्देशांक (AQI) गुरुवारी दुपारी 2 वाजता 999 वर पोहोचला. हे सर्वोच्च प्रमाण आहे.

यापेक्षा जास्त AQI नोंदवलेला नाही. त्याचवेळी, दिल्लीच्या इतर भागातही हवेची गुणवत्ता 500 च्या पुढे गेली आहे. तर नोएडाच्या सेक्टर 62 मध्ये 469 नोंदवले गेले. सर्वत्र धुके पसरले आहे, अशी परिस्थिती आहे. दिल्लीवासीयांना आज सूर्यदर्शन झाले नाही.

यापूर्वी, 4 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीचा AQI 999 नोंदवला गेला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये दिल्लीचा सरासरी AQI 257 होता.

आजची हवेची स्थिती

दिल्लीतील (Delhi) हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. SAFAR ने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजता दिल्लीचा हवेचा निर्देशांक 351 नोंदवला गेला.

तारीख AQI

01 नोव्हेंबर 364

31 ऑक्टोबर 359

30 ऑक्टोबर 347

29 ऑक्टोबर 325

28 ऑक्टोबर 304

27 ऑक्टोबर 261

दुसरीकडे, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) केलेल्या विश्लेषणानुसार, राजधानीत 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान सर्वाधिक प्रदूषण होते. मात्र यावेळी वेळेपूर्वी हवा खराब झाली आहे.

शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, यामागील कारण म्हणजे कमी पाऊस आणि पराली जाळणे. येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआर भागातील हवेची स्थिती आणखी बिघडण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची काळजी

दरम्यान, लहान मुले आणि वृद्धांमध्ये दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांमध्ये संभाव्य वाढीबद्दल आरोग्य तज्ञ चिंतेत आहेत. संशोधक विशाल सोमवंशी यांनी सांगितले की, वाढत्या प्रदूषणाचा मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याचवेळी, पालक डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगत आहेत.

सरकार काय करतंय?

दुसरीकडे, वाहनांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने रेड लाइट ऑन गाडी ऑफ लॉन्च केली आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी सांगितले की, सरकार (Government) सलग पाच दिवस 400 बिंदूंच्या वर हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नोंदवणाऱ्या भागात बांधकाम कामावर बंदी घालणार आहे.

GRAP-2 दिल्लीत लागू

दिल्लीच्या पर्यावरण मंत्रालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP-2) लागू केला आहे. याअंतर्गत कोळसा आणि लाकडाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, सीएनजी आणि इलेक्ट्रॉनिक बसेसच्या फेऱ्या वाढवणे, रस्त्यांची नियमित स्वच्छता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काम केले जाणार आहे.

दिल्लीभोवती काय स्थिती आहे?

गाझियाबाद 230

फरीदाबाद 324

गुरुग्राम 230

नोएडा 295

ग्रेटर नोएडा 344

AQI चा अर्थ काय आहे?

शून्य ते 50 मधील AQI चांगला मानला जातो.

51 आणि 100 च्या दरम्यान समाधानकारक.

101 आणि 200 दरम्यान मध्यम.

201 आणि 300 दरम्यान खराब.

301 आणि 400 च्या दरम्यान खूप खराब.

401 आणि 500 ​​दरम्यान गंभीर.

भाजपचा आरोप - केजरीवालांनी दिल्लीला गॅस चेंबर बनवले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या असंवेदनशीलतेमुळे दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. आज प्रत्येक दुसरा व्यक्ती डोळ्यांची जळजळ आणि घशातील संसर्गाची तक्रार करत आहे.

दिल्लीचा AQI 740 वर पोहोचल्याने, केजरीवाल यांचे वचन दिलेले वॉटर स्प्रिंकलर, अँटी स्मॉग गन मशीन आणि एअर प्युरिफायर कुठेही सापडत नाहीत. काल पंजाबमधून 1591 शेते जळल्याच्या अहवालानंतर, दिल्लीला पुढील 48 तासांत कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT